जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या; भरदिवसा कोयत्याने सपासप वार करत संपवलं

पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या; भरदिवसा कोयत्याने सपासप वार करत संपवलं

पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या; भरदिवसा कोयत्याने सपासप वार करत संपवलं

Criminal killed in Pune: पुण्यात एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 11 जुलै : एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील दत्तवाडी (Dattawadi Pune) परिसरात ही हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या गुंडाचे नाव अक्षय किरतकिर्वे (Akshay Kiratkirve) असून त्याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या (murder) करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील दत्तवाडी परिसरात सायंकाळच्या सुमारास अक्षय किरतकिर्वे याची हत्या करण्यात आली आहे. चौघा जणांच्या टोळक्याने भरदिवसा अक्षय किरतकिर्वे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हत्या केल्यानंतर या चौघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला. मोठी बातमी! काशीद बीच समोरील पूल कोसळला; एक कार आणि बाईक गेली वाहून, एकाचा मृत्यू भरदिवसा पुण्यात झालेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात गुंड अक्षय किरतकिर्वे हा गंभीर जखमी झाला होता. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पूर्व वैमनस्यातून ही हत्या केली असावी असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपींनी आपली दहशत माजवण्यासाठी ही असं कृत्य केलं असावं असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात