ठाणे, 15 मे: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका अल्पवयीन मुलानं आपल्या 25 वर्षीय भावाची निर्घृण हत्या (Minor brother killed elder brother) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वेतनाचे पैसे काढून घेतल्यानं संतापलेल्या लहान भावानं आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संबंधित अल्पवयीन भावानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
संबंधित 25 वर्षीय मृत भावाचं नाव हफिजुल्लाह अन्सारी असून तो भिवंडीतील ओवळी भागातील एका कंपनीत कामाला होता. याठिकाणी तो हमालीचं काम करत होता. महिनाभरापूर्वी त्यानं आपल्या 13 वर्षीय भावाला उत्तर प्रदेशातून या कंपनीत काम करण्यासाठी आणलं होतं. दोघंही भावंड कंपनीनं दिलेल्या खोलीत राहत होते.
11 मे रोजी कंपनीनं दोघांचा पगार केला. यावेळी लहान भावाला देखील 7 हजार रुपये वेतन मिळालं. पण तो लहान असल्यानं मृत मोठ्या भावानं त्याच्या सर्व पैसे काढून घेतले. याचा राग धाकट्या भावाला आला. ज्यामुळे दोघांत भांडण सुरू झालं. दरम्यान संतापलेल्या लहान भावानं हफिजुल्लाहच्या डोक्यात लाकडी फळीनं वार केला. या लाकडी फळीच्या एका फटक्यात हफिजुल्लाह बेशुद्ध पडला. यानंतर आरोपी लहान भावानं मोठ्या भावाच्या तोंडा बोळा कोंबून जबरी मारहाण केली. ज्यामध्ये हफिजुल्लाहचा जागीचं मृत्यू झाला.
हे ही वाचा-सख्खं नातं हरलं! कोरोनाबाधित बहिणीचा मृत्यू होताच भावानं हडपले 12 लाखाचे दागिने
यानंतर लहान भावानं घराला कुलुप लावून घराबाहेरच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी परिसरात दुर्गंधी पसरू लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी फोन करून याबाबतची माहिती नारपोली पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी मृत हफिजुल्लाहच्या भावाची चौकशी केली असता, त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी लहान भावाला ताब्यात घेतलं असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi, Murder, Thane crime