मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

सख्खं नातंही हरलं! कोरोनाबाधित बहिणीचा मृत्यू होताच भावानं हडपले 12 लाखाचे दागिने

सख्खं नातंही हरलं! कोरोनाबाधित बहिणीचा मृत्यू होताच भावानं हडपले 12 लाखाचे दागिने

एका कोरोनाबाधित (Corona Positive) महिलेचं निधन झालं. आरोप आहे, की या महिलेच्या भावानं तिच्या निधनानंतर तिचे 12 लाखाचे दागिने हडपले आहेत. हे दागिने रुग्णालयात (Hospital) भर्ती होण्यााआधी महिलेनं आपल्या भावाकडे दिले होते.

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 14 मे : कोरोनाकाळात (Corona Pandemic) अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यात आपलीच माणसं आपल्यांची साथ सोडून जात आहेत. या कठीण काळातही रुग्णांच्या टाळूवरचं लोणी खाण्यात डॉक्टर (Doctors) किंवा नातेवाईकही मागे सरत नाहीत. हारलेल्या नात्याचं आणखी एक असंच उदाहरण आता समोर आलं आहे. यात एका कोरोनाबाधित (Corona Positive) महिलेचं निधन झालं. आरोप आहे, की या महिलेच्या भावानं तिच्या निधनानंतर तिचे 12 लाखाचे दागिने (Jewelry) हडपले आहेत. हे दागिने रुग्णालयात (Hospital) भर्ती होण्यााआधी महिलेनं आपल्या भावाकडे दिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनानं मृत्यू झालेली महिला मुंबईहून कामानिमित्त कानपूरला आली होती. मृत महिलेच्या मुलांनी आपल्या मामाविरोधात कल्याणपूर ठाण्यात एफआयआर दाखल केलं आहे. मुलांचं असं म्हणणं आहे, की जोपर्यंत मामाला शिक्षा मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही.

मृत महिलेच्या मुलीनं आपल्या मामावर असा आरोप केला आहे, की त्यानं रुग्णालयात दाखल करण्याआधी आपल्या आईचे सर्व दागिने काढून घेतले आणि काही वेळातच महिलेचा मृत्यू झाला. यानंतर तिनं मामाकडे आपल्या आईचे दागिने आणि पैसे मागितले मात्र मामनं यावर काहीच उत्तर दिलं नाही. यामुळे या मुलीला आपल्या मामाविरोधात तक्रार करावी लागली. हे करताना आपल्यालाही खूप वाईट वाटल्याचं मुलीनं म्हटलं.

भाचीचं असं म्हणणं आहे, की तिनं स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की मामाचं असं रूप तिला पाहायला मिळेल. मुंबईच्या मीरा रोडवर राहाणाऱ्या या मुलीनं सांगितलं, की कानपूरच्या कल्याणपूरमध्ये तिच्या मामाचं घर आहे. या मुलीनं सांगितलं, की तिची आई २५ एप्रिलला मुंबईहून आपला भाऊ अजयला भेटण्यासाठी आली होती. इथे महिलेला कोरोनाची लागण झाली. यानंतर रुग्णवाहिकेनं त्यांना उर्सला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याचवेळी भाऊ अजयनं महिलेचे सर्व दागिने काढून घेतले आणि पैसेही स्वतःकडे ठेवून घेतले.

महिलेच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब मुंबईहून कानपूरला आलं. इथे हॉटेलमध्ये थांबून ते आई बरी होण्याची वाट पाहात होते. मात्र, पाच मे रोजी महिलेचं कोरोनानं निधन झालं. अंत्यसंस्कारानंतर मुलीनं मामाकडे आपल्या आईचे दागिने आणि पैसे मागितले. मात्र, मामानं भाचीला धमकी देत हे दागिने देण्यास नकार दिला. पैसे तू ठेव मात्र आईची शेवटची वस्तू म्हणून दागिने आमच्याकडे राहू दे, अशी विनंती आरिकानं केली, मात्र मामानं काहीही देण्यास नकार दिला.

First published:

Tags: Corona patient, Patient death, Theft