मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /अयोध्येत महंताची विटेनं ठेचून निर्घृण हत्या, परिसरात खळबळ

अयोध्येत महंताची विटेनं ठेचून निर्घृण हत्या, परिसरात खळबळ

Ayodhya Murder: रामजन्मभूमी अयोध्येत काल रात्री एका नागा साधुची निर्घृण हत्या (Naga Monk Murder in ayodhya) करण्यात आली आहे. शनिवारी रात्री झोपलेलं असताना हल्लेखोराने त्यांच्या डोक्यात विटाने अनेक वार (Attack with Brick) केले आहे

पुढे वाचा ...

अयोध्या, 04 एप्रिल : रामजन्मभूमी अयोध्येत काल रात्री एका नागा साधुची निर्घृण हत्या (Naga Monk Murder in ayodhya) करण्यात आली आहे. शनिवारी रात्री झोपलेलं असताना हल्लेखोरानं त्यांच्या डोक्यात विटाने अनेक वार (Attack with Brick) केले आहे. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित हत्येची बातमी अयोध्या नगरीत वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. यानंतर मोठ्या संख्येनं हनुमानगढीचे नागा साधू एकत्र जमले होते. या घटनेची माहिती मिळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. संबंधित मृत नागा साधुचं नाव कन्हैया दास असून ते गुलचमन बाग येथील महंत होते.

संबंधित घटना अयोध्यातील चरण पादुका मंदिराच्या गौशाळेत घडली आहे. गुलचमन बागचे महंत कन्हैया दास चेलाराम रामवरन दास यांची झोपल्या जागी शिरावर विटाने अनेक वार करून हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्याचबरोबर बोटांचे ठसे शोधण्यासाठी एका विशेष टीमलाही पाचरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. या हत्येनंतर घटनास्थळी हनुमानगढीच्या नागा साधुंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मृत साधुचे गुरु भाऊ रामानुजदास चेला रामबरन दास यांनी सांगितलं की, मृत साधू कन्हैया दास हनुमानगढी मंदिराच्या शेजारी असलेल्या गुरुचमन बागेत जेवण केल्यानंतर चरण पादुका मंदिराच्या गौशाळेत झोपायला जात असतं. काल रात्रीही ते नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गौशाळेत गेले होते. पण काल रात्री गाढ झोपेत असताना हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली आहे. मृत साधुचा गोलू दास उर्फ शशिकांत दास यांच्याशी घराच्या जमीनीवरून वाद होता. याच वादातून हत्या त्यांची झाल्याचा आरोप मृत साधुचे गुरू भाऊ रामानुजदास चेला रामबरन दास यांनी केला आहेत.

हे ही वाचा- अंधश्रद्धेला बळी पडून एअरफोर्सच्या कर्मचाऱ्यानं चुलतीला संपवलं; चाकू भोकसून खून

या हत्येप्रकरणी आयोध्या पोलीस स्थानकात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोलू दास याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे. संबंधित घटनेत जो कोणी दोषी असेल त्यांना तातडीनं अटक करून कडक कारवाई करू असं अश्वासन पोलीस अधिक्षक विजय पाल सिंह यांनी दिलं आहे.

First published:

Tags: Ayodhya, Murder, Uttar pradesh