बस्ती, 04 एप्रिल: भारतीय वायूसेनेच्या निवृत्त कर्मचाऱ्याने (Air Force retired employee) भूत-प्रेत आणि अंधश्रद्धेच्या आहारी (superstition case) जाऊन आपल्या सख्ख्या चुलतीची निर्घृण हत्या (Aunt Murder) केल्याची माहिती समोर येते आहे. संबंधित घटना तंत्र-मंत्राच्या आहारी जाऊन केली असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पुतण्याला अटक (Arrest) केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हृदय पिळवटून टाकणारी ही घटना उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्याच्या सिंगही गावातील आहे. येथील एका भारतीय वायूसेनेच्या निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या 70 वर्षीय सख्ख्या चुलतीची चाकू भोकसून हत्या केली आहे. संबंधित आरोपीने अंद्धश्रद्धेच्या आहारी जाऊन ही हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संबंधित मृत महिलेचं नाव गायत्री देवी असून त्या सिंगही गावच्या रहिवासी आहेत. सध्या त्या एकटीच राहत असून पती शुभकरन यांचा यापूर्वीचं मृत्यू झाला आहे.
त्याचबरोबर मृत महिलेची दोन्ही मुलं दिल्लीत आपल्या परिवारासोबत राहून नोकरी करतात. तसेच त्यांच्या सर्वात लहान मुलीचंही लग्न झालं आहे. पण त्यांची मुलगी गेल्या एक महिन्यापासून गायत्री देवी यांच्यासोबतच राहत आहे. या घटनेची प्रथमदर्शिनी असणारी मुलगी गम्मजने सांगितलं की, 'ती आणि तिची आई घरासमोरील मोकळ्या जागेत गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा त्याठिकाणी मोठ्या चुलत्याचा मुलगा गंगाराम आला आणि त्याने आईवर चाकून हल्ला चढवला. त्याने आईच्या चेहऱ्यावर आणि मानेवर अनेक वार केले. त्यामुळे या दुर्दैवी हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.'
(हे वाचा - 'देवा मला भिकारी केलंस, मी तुला सोडणार नाही', तरुणाने देवांवरच काढला राग)
एसपी आशिष श्रीवास्तव यांनी सांगितलं की, आरोपी पुतण्या गंगारामविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. हत्येसाठी वापरलेलं रक्ताने माखलेलं हत्यारही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अंधश्रद्धेला बळी पडून पुतण्याने सख्ख्या चुलतीची हत्या केल्याचं त्यानं सांगितलं आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder, Uttar pradesh