जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / क्षणभर रागाने कुटुंबच संपलं, पत्नी आणि मुलाचा जीव घेतल्यावर पतीचं धक्कादायक कृत्य

क्षणभर रागाने कुटुंबच संपलं, पत्नी आणि मुलाचा जीव घेतल्यावर पतीचं धक्कादायक कृत्य

क्षणभर रागाने कुटुंबच संपलं, पत्नी आणि मुलाचा जीव घेतल्यावर पतीचं धक्कादायक कृत्य

एका व्यक्तीनं पत्नी आणि 11 वर्षाच्या मुलाला कथित स्वरुपात मारहाण करून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:देखील आत्महत्या केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

राजस्थान, 09 मे : कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची वेळ आली. सगळ्यांना घरी बसावं लागलं. पण तरीदेखील गुन्हे होण्याचं प्रमाण काही केलं कमी होत नाहीये. असाच एक हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीनं पत्नी आणि 11 वर्षाच्या मुलाला कथित स्वरुपात मारहाण करून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:देखील आत्महत्या केली. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील बिलानियासर गावात पोलीस स्टेशन परिसरातील आहे. जससरार पोलीस स्टेशनचे प्रभारी उदयपाल सिंह यांनी सांगितलं की, सुमन (वय 35) ही बिल्नियासर गावच्या उप-आरोग्य केंद्रात एएनएम म्हणून कार्यरत होता. ती आपल्या 11 वर्षाच्या मुलासमवेत इथल्या सरकारी घरात राहत होती. तिचा नवरा सुरेश झुंझुनूंपासून सुमारे दोन महिन्यांपूर्वी तिथे आला होता. VIDEO: कोरोनाच्या विळख्यात मुंबईकरांसाठी आली Good News, पहिल्यांदाच घडलं असं प्राथमिक तपासणीनुसार, ‘शुक्रवारी रात्री पती-पत्नीमध्ये शाब्दिक वाद झाला. यामुळे संतापून पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केली. नंतर त्याने स्वत:ला फाशीवर लटकून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे एकाच कुटुंबातील तिघांचा जीव गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस दलात कोरोनामुळे 6वा मृत्यू, नाशिकमध्ये तैनात कॉन्स्टेबलने सोडला जीव शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांना तीन मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडले. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहेत. …नाहीतर मालेगावमध्ये कोरोनामुळे ओढावेल मोठा अनर्थ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात