जयपूर, 3 जानेवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) एका विवाहितेने सोमवारी विष घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही विवाहित IAS अधिकाऱ्याची सून आहे. दोन महिन्यांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वडिलांना फोन करून पोट दुखत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर तिचा (IAS officer’s daughter-in-law commits suicide) मृत्यू झाला. पोलीस आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. ही घटना आयएएस अधिकारी बीएल मेहरा यांच्या घरात घडली. त्यांची पोस्टिंग अरमेर येथे आहे. त्यांचा मुलगा शिक्षण विभागात एलडीसीमध्ये काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकाऱ्यांची सून प्रियंका (25) हिने 1 जानेवारी रोजी विष घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वी तिची तब्येत बिघडली होती. यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर रविवारी तिचा मृत्यू झाला. हे ही वाचा- 4 दिवसांपर्यंत सरकारी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकली महिला,शेवटी अशी झाली अवस्था वडिलांशी झालं होतं बोलणं.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी प्रियंकाने आपल्या वडिलांसोबत फोनवर संभाषण केलं होतं. तिला पोटदुखीचा त्रास होत होता. आत्महत्येच्या वेळी प्रियंका घरी एकटी होती. प्रियंकाचं लग्न गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर रोजी झाली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या कौटुंबिक जीवनात सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र तरीही प्रियंकाने 1 जानेवारी रोजी विष खाल्लं. त्यानंतर रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.