नवी दिल्ली, 2 जानेवारी : पश्चिम बंगालची राजधानी कलकत्तामधील (Kolkata) एका सरकारी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये एक महिला चार दिवसांपर्यंत अडकली होती. आणि धक्कादायक म्हणजे कोणालाच याबाबत माहिती नव्हती. लिफ्टमध्ये अडकलेली असताना महिला आरडाओरडा करीत होती. मात्र कोणीच आवाज ऐकला नाही. महिलेने तर सर्व आशाच सोडली होती. चार दिवसांपर्यंत लिफ्टमध्ये बंद असताना 300 मिलीलीटर पाणी हा एकमेव तिच्याकडे आधार होता.
गेल्या सोमवारी 60 वर्षीय महिला रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये डॉक्टरांना दाखवण्यासाठी आली होती. आणि त्यांना चौथ्या मजल्यावर जायचं होतं. पायाचं दुखणं असल्यामुळे त्यांनी लिफ्ट वापरण्याचा विचार केला. तेथे एक मोठी लिफ्ट होती आणि दुसरी लहान. महिला छोट्या लिफ्टमध्ये चढली, मात्र दुसऱ्या मजल्याजवळ येताच लिफ्ट बंद झाली. आणि सोमवार ते शुक्रवार सलग चार दिवसांपर्यंत ती लिफ्टमध्ये अडकली. हे चार दिवस ती जगण्यासाठी संघर्ष करीत होती.
हे ही वाचा-नववर्षानिमित्त काढलेला हा सेल्फी ठरला शेवटचा; अख्खं कुटुंब झालं उद्ध्वस्तपाणी आणि चिवडा खावून राहिली जीवंत..
बंगाली समाचार पत्र गणशक्तीमध्ये आलेल्या वृत्तानुसार, बादुडियामध्ये चंदीपूर गावातील वासिंदा आनोयारा यांनी सांगितलं की, लिफ्टमध्ये अडकल्यानंतर ती बराच वेळ आरडाओरडा करीत होती. मात्र कोणीच तिचा आवाज ऐकला नाही. महिलेने सांगितलं की, माझ्याकडे एक पाण्याची बाटली आणि चिवड्याचं पॅकेट होतं. दररोज थोडा चिवडा आणि पाणी पित होते. आणि दार उघडण्याची वाट पाहत होते.
लिफ्टमधून अशी निघाली महिला...
चार दिवसांपर्यंत महिला घरी नव्हती, त्यामुळे कुटुंबीयही तिचा शोध घेऊ लागले. ते रुग्णालयातही पोहोचले. मात्र ती तेथे त्यांना सापडली नाही. शुक्रवारी तिच्या ओळखीची एक व्यक्ती रुग्णालयात पोहोचली. येथे त्यांनी लिफ्टमधून महिलेचा आवाज येत होता. यानंतर तातडीने लोकांना बोलावण्यात आलं आणि महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढलं. चार दिवस अंधारात राहावं लागल्यामुळे महिला खूप घाबरली होती.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.