मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

घोटाळेबाज शिल्पा ! मोठमोठ्या सेलिब्रेटींकडून 100 कोटी लुबाडणाऱ्या महिलेचे कारस्थान उघड

घोटाळेबाज शिल्पा ! मोठमोठ्या सेलिब्रेटींकडून 100 कोटी लुबाडणाऱ्या महिलेचे कारस्थान उघड

एका दिव्या नावाच्या महिलेने नरसिंही पोलीस ठाण्यात (Narsinghi Police Station) शिल्पा विरोधात तक्रार केली होती. शिल्पाने आपल्याकडून 5 लाख रुपये घेतले. पण ते परत केलेच नाहीत, अशी तक्रार तिने केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil

हैदराबाद, 27 नोव्हेंबर : हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) एका महिला उद्योगपतीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रसिद्ध व्यक्ती, मोठमोठ सेलिब्रेटी, तसेच उद्योगपती यांचे कथितरित्या कोट्यवधी रुपये लुबाडल्याप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेचं शिल्पा उर्फ शिल्पा चौधरी (Businesswoman Shilpa Chaudhary) असं नाव आहे. आरोपी महिलेच्या इंटरेस्ट एंटरप्रायजेस या कंपनीविरोधात पोलिसात फसवणुकीच्या (Cheating) अनेक तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरु होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी शिल्पा आणि तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे.

काळा पैसा पांढरा करुन देण्याचं आश्वासन

आरोपी महिलेचे टॉलिवूडमधील सुपस्टार्ससोबत चांगले संबंध होते. याच ओळखीचा वापर करुन तिने अनेकांना दुप्पट पैशांची परतफेड करण्याचं लालच दिलं. तसेच अनेकांना काळा पैसा पांढरा करुन देण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे तिच्या जाळ्यात अनेक मोठमोठे मासे अडकले. अखेर आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर काहींनी पोलिसात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा : जागेसाठी चुलत्याने केली मारहाण, पुतण्याने घेतले पेटवून, जालन्यातील घटना

100 कोटी पेक्षाही जास्त रुपयांची फसवणूक

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा आरोपी शिल्पाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींना लुबाडल्याचं समोर आलं. महिलेने लोकांची फसवणूक करुन 100 कोटी पेक्षाही जास्त पैसे वसूल केले आहेत. महिलेने खोटं बोलून आणि फसवणूक करुन एकूण नेमकी किती संपत्ती गिळंकृत केली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. महिलेला अटक करण्यात आल्यानंतर अनेक पीडित समोर आले आहेत. त्यांनी आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची पोलिसांना माहिती दिली आहे.

हेही वाचा : 'तो दिवस लांब नाही, भाजपचे सरकार येणारच', आता दरेकरांचे सत्ताबदलाचे संकेत?

प्रकरण उघडकीस कसं आलं?

मिळालेल्या माहितीनुसार, एका दिव्या नावाच्या महिलेने नरसिंही पोलीस ठाण्यात (Narsinghi Police Station) शिल्पा विरोधात तक्रार केली होती. शिल्पाने आपल्याकडून 5 लाख रुपये घेतले. पण ते परत केलेच नाहीत, अशी तक्रार तिने केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासादरम्यान पोलिसांना आणखी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यामुळे पोलिासांनी थेट शिल्पाला ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर तिच्या पतीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शिल्पाच्या बँक खात्यांविषयी माहिती मिळवली. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिल्पा लोकांना कमी वेळेत मुद्दल पेक्षा दुप्पट-तिप्पट पैशांच्या परतफेडीचं आमिष दाखवायची. त्याचबरोबर ती लोकांना फसविण्यासाठी टॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्गजांच्या ओळखीचा फायदा घेऊन पेज-3 पार्ट्यांचे आयोजन करायचे. या द्वारे तिने अनेक सेलेब्रिटीजला लुबाडलाची माहिती समोर आली आहे.

First published: