मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

12 तासात गूढ उलगडलं; दुबईहून परतलेल्या पतीच्या हत्येसाठी 3 लाखांची सुपारी, धक्कादायक कारण

12 तासात गूढ उलगडलं; दुबईहून परतलेल्या पतीच्या हत्येसाठी 3 लाखांची सुपारी, धक्कादायक कारण

गेल्या काही वर्षांत विवाहबाह्य संबंध, प्रेमप्रकरणातून हत्येसारखे गंभीर गुन्हे (Crime) घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या काही गुन्ह्यांमध्ये महिलांचा सहभागदेखील असल्याचं पोलीस तपासातून वारंवार समोर आलं आहे.

चंदीगड, 13 जून : गेल्या काही वर्षांत विवाहबाह्य संबंध, प्रेमप्रकरणातून हत्येसारखे गंभीर गुन्हे (Crime) घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या काही गुन्ह्यांमध्ये महिलांचा सहभागदेखील असल्याचं पोलीस तपासातून वारंवार समोर आलं आहे. पंजाबमध्ये (Punjab) नुकतीच अशा प्रकारची एक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणात (Love Affair) अडसर ठरत असलेल्या पतीची पत्नीनं प्रियकराला सुपारी देऊन हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या प्रकरणात छेहरटा पोलिसांनी सतनाम कौर, तिचा प्रियकर अर्शदीप सिंग आणि वरिंदर सिंग या तिघांना अटक केली आहे. `अमर उजाला`ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पंजाबमधल्या अमृतसरमधल्या एका व्यक्तीच्या पत्नीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं सुपारी देऊन पतीची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी या महिलेने चोरीची खोटी कहाणी रचली. परंतु, पोलिसांना ही कहाणी खोटी असल्याचं जाणवलं. त्यामुळे पोलिसांना वेगानं तपास सुरू केला. पोलिसांचा या महिलेवर संशय बळावत गेला आणि त्यांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिनं घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तपासाचं चक्र वेगानं फिरवून अवघ्या 12 तासांत या हत्याप्रकरणाचा (Murder Case) छडा लावला.

याबाबत पोलीस कमिशनर अरुणपाल सिंग यांनी रविवारी (12 जून) संध्याकाळी या प्रकरणाची आणि एकूण तपासाची माहिती पोलीस लाइन येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, `काले गावचे रहिवासी हरिंदर सिंग काही दिवसांपूर्वी दुबईहून (Dubai) परतले होते. ते गेली 10-12 वर्षं दुबईत वास्तव्याला होते. त्यांची पत्नी सतनाम कौर हिचे याच गावातल्या अर्शदीप सिंगसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती हरिंदर यांना समजली. त्यामुळे त्यांनी पत्नीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. दुसरीकडे सतनाम कौर आणि अर्शदीप सिंग यांनी संगनमतानं हरिंदर यांचा अडथळा दूर करण्यासाठी कट रचला. त्यासाठी गावातल्या वरिंदर सिंग याला दोन लाख 70 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली.

रविवारी पहाटे 3.30 वाजता हरिंदर त्यांची पत्नी सतनाम कौर आणि दोन मुलांसमवेत मोटार सायकलवरून श्री दरबार साहिब येथे दर्शनासाठी निघाले. हे सर्व जण हरकृष्ण नगरजवळ दशमेश गन हाउसनजीक येताच अर्शदीप आणि वरिंदर सिंग यांनी हरिंदर यांची गोळ्या झाडून हत्या केली. या वेळी हरिंदर यांचा मोबाइल फोन आणि पैशाचं पाकीट घेऊन आरोपी फरार झाले. या घटनेनंतर मृताची पत्नी सतनाम कौर हिने पोलिसांना चोरीची खोटी कहाणी सांगितली; पण पोलिसांनी केलेल्या तपासात या घटनेमागचं सत्य समोर आलं.`

या हत्येप्रकरणी सतनाम कौर, अर्शदीप सिंग आणि वरिंदर सिंग यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून हत्येसाठी वापरलं गेलेलं पिस्तुल (Pistol) जप्त करण्यात आलं आहे. हे पिस्तुल अर्शदीप सिंगचे मुंबईत राहणारे काका लाल सिंग यांचं असून, अर्शदीपनं ते चोरलं होतं, अशी माहिती एडीसीपी-2 प्रभज्योत सिंग यांनी दिली. या प्रकरणाची अमृतसरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Dubai, Love story, Murder, Punjab