जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / सासरच्या मंडळीचा प्लॉटवर डोळा, पतीने घोटला पत्नीचा गळा!

सासरच्या मंडळीचा प्लॉटवर डोळा, पतीने घोटला पत्नीचा गळा!

सासरच्या मंडळीचा प्लॉटवर डोळा, पतीने घोटला पत्नीचा गळा!

पती इरफानने सनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करणे, शारिरिक आणि मानसिक छळ करत होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

माढा, 08 ऑगस्ट :  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात घडली आहे. एवढंच नाहीतर पत्नी प्लॉट नावावर करत नाही म्हणून  पतीने हे कृत्य केले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. माढ्यातील शुक्रवार पेठ परिसरात मोमीन गल्लीत शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. सना इरफान मोमीन (वय 27) असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती इरफान रजाक मोमीन, सासरा आणि सासूवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळी तिघांनीही अटक करण्यात आली आहे.  मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली.  पती इरफानने खूनाची कबुली दिली आहे. आवाज कुणाचा..? उद्धव ठाकरे पुन्हा टॉप फाईव्ह लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सना आणि इरफानचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी आहे. परंतु, लग्नाच्या दोन महिन्यापासून माहेराहुन काहीच आणले नाही म्हणून सनाचा छळ सुरू होता. एवढंच नाहीतर सनाच्या नावावर उस्मानाबादेत एक प्लॉटवर होता. हा प्लॉट आपल्या नावावर करून दे म्हणून तिला अनेक वेळा मारहाणही करण्यात आली होती. पती इरफानने सनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करणे, शारिरिक आणि मानसिक छळ करत होता.याच वादातून शुक्रवारी इरफान आणि सनामध्ये पुन्हा वाद उफाळला. इरफानने रागाच्या भरात सनाचा गळा दाबून खून केला. पुण्यात धक्कादायक प्रकार, रेणुकामाता मंदिराचा कळस गेला चोरीला घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सनाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर  सनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर दुसरीकडे या प्रकरणी जोपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत नाही अशी मागणी करत सनाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही. अखेर आज शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्याता आला. या प्रकरणी सनाचे वडील महंमदमुसा अन्सारी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: solapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात