मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आवाज कुणाचा..? उद्धव ठाकरे पुन्हा टॉप फाईव्ह लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत

आवाज कुणाचा..? उद्धव ठाकरे पुन्हा टॉप फाईव्ह लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत


याआधीही झालेल्या एका सर्वेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला होता.

याआधीही झालेल्या एका सर्वेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला होता.

याआधीही झालेल्या एका सर्वेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला होता.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 08 ऑगस्ट : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. पण, महाराष्ट्रात कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करत राज्याचा गाडा हाकण्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहे. देशातील चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी पाचवे स्थान पटकावले आहे.

इंडिया टूडे आणि कार्वी इनसाइट्स या संस्थेच्या वतीने  संयुक्तपणे एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेच्या निष्कर्षातून टॉप 5 नाव समोर आली आहे. यात पहिल्या स्थानवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला स्थान कायम राखले आहे. याआधी जानेवारी महिन्यात याच संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हा आणि आज उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सात टक्के लोकांनी उद्धव ठाकरे हे चांगले काम करत असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांना जानेवारीमध्ये 18 टक्के लोकांनी पसंती दिली होती. ती आता 24 टक्क्यांवर पोहोचली आहे.

पार्थ यांनी केली होती सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी, रोहित पवार म्हणाले...

दुसऱ्या स्थानावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बाजी मारली आहे.त्यांना १५ टक्के  लोकांनी पसंती दिली आहे. तर तिसऱ्या स्थानावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी यांचा क्रमांक लागला आहे. त्यांच्यानंतर चौथ्या स्थानावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे, या यादीत पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे बिगर भाजपशासित आणि काँग्रेसशासित राज्यातील आहे. नितीशकुमार यांच्या लोकप्रियेत घट झाली आहे. त्यांना फक्त 7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

भाजप खासदाराचा प्रताप, मध्यरात्री सलून उघडायला लावले आणि केली कटिंग, VIDEO

याआधीही जून महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला होता. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता पाहण्यासाठी आयएएनएस आणि सी वोटर्सकडून संयुक्तरित्या एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाचव्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते असल्याचं जाहीर करण्यात आलं होते.  या  सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरे हे पाचव्या स्थानावर होते. उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के इतकी नोंद झाली होती.

First published: