मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नाती हारली! कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पत्नीची गळा चिरून हत्या, पतीनं स्वतःही दिला जीव

नाती हारली! कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या पत्नीची गळा चिरून हत्या, पतीनं स्वतःही दिला जीव

कोरोनाबाधित पत्नीची पतीनंच हत्या (Husband kills his Corona Positive Wife) केली आहे. इतकंच नाही तर यानंतर पतीनं स्वतःही आत्महत्या केली आहे.

  • Published by:  Kiran Pharate

पाटणा 26 एप्रिल : कोरोनाकाळात (Coronavirus) अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचं समोर येत आहे. कुठे नाती दुरावताना दिसत आहेत, अनेकजण कुटुंबीयांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत असल्याचं चित्र आहे, तर कुठे कोरोना रुग्णांच्या आत्महत्येचं (Suicide) वृत्त येत आहे. अशात आता आणखी एका घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेत कोरोनाबाधित पत्नीची पतीनंच हत्या (Husband kills his Corona Positive Wife) केली आहे. इतकंच नाही तर यानंतर पतीनं स्वतःही आत्महत्या केली आहे.

ही घटना बिहारच्या पाटणामधील आहे. पाटणा जंक्शनवर तैनात स्टेशन मास्टर अतुल लालनं आपली पत्नी तुलिका प्रसाद हिची हत्या केली आहे. गळा चिरुन त्यानं पत्नीचा जीव घेतला आहे आणि यानंतर स्वतःही आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा दाम्पत्याची दोन्ही मुलं दुसऱ्या खोलीत झोपली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून यामागचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

पुण्यात महिलांपेक्षा पुरुषांवर भारी पडतोय कोरोना; वर्षभरातील बळींमध्ये 67% पुरुष

रविवारी रात्री उशिरा अतुल लालनं आपल्या पत्नीची हत्या करुन आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. सोमवारी या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आसपासच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पत्रकारनगर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांच्या सूत्रांचं असं म्हणणं आहे, की मृत महिला एका खासगी संस्थेत काम करत होती. तर, तिचा पती रेल्वेमध्ये कामाला होता. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असून प्रकरणात नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

ठाकरे सरकारकडून लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा, 5 हजार कोटी करणार खर्च!

रविवारी कोरोनामुळे बिहारमध्ये 118 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 27 रुग्ण पाटणामधील होते. तर 91 बिहारच्या इतर जिल्ह्यांमधील होते.

First published:

Tags: Coronavirus, Crime news, Murder news