पुणे, 26 एप्रिल : कोरोनाव्हायरसला (Coronavirus) जवळपास एक वर्ष उलटलं आहे. पण अद्यापही या व्हायरसबाबत संशोधन सुरू आहे. रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. कोरोनाच्या महासाथीला सुरुवात झाली. त्यानंतर जे आकडे आले, शिवाय जे संशोधन झालं त्यातून कोरोनाचा सर्वाधिक धोका हा पुरुषांना असल्याचं दिसून आलं होतं. आता वर्षभरानंतर पुण्यातूनही (Pune coronavirus) अशीच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पुण्यात महिलांपेक्षा पुरुषांना कोरोना सर्वात जास्त भारी पडत आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाने तब्बल 67 टक्के पुरुषांचा बळी (Pune corona death) घेतला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वात पहिला रुग्ण पुण्यातच आढळला होता. तर एप्रिलमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला होता. आता याला वर्ष उलटलं आहे. वर्षभरातील पुण्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पाहिला तर 20 एप्रिलपर्यंत एकूण 6,218 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे पुरुषांचं आहे. यात 4,137 पुरुष आणि 2081 महिला आहेत. टक्केवारीत पाहायचं म्हटलं तर 67 टक्के पुरुष आणि 33 टक्के महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
20 एप्रिल 2021 पर्यंत पुण्यातील मृत कोरोना रुग्णांची आकडेवारी
वय पुरुष महिला एकूण
60 वर्षांपेक्षा जास्त 2792 1371 4163
40 ते 60 1125 609 1735
20 ते 40 212 90 302
20 वर्षांपेक्षा कमी 8 10 18
हे वाचा - मे महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला 4 लाखांहून अधिक रुग्ण आढळणार, तज्ज्ञांचा दावा
शहरात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांची संख्या वाढत गेली. ऑक्टोबर 2021 पासून रुग्णसंख्येसह मृत्यूचा आकडाही घसरला होता. जानेवारी-फेब्रुवारी, 2021 मध्ये हा आकडा दहाच्या आतच होता. पण मार्चपासून रुग्णसंख्येसह मृतांचा आकडाही वाढू लागला. एप्रिल, 2021 मध्ये दैनंदिन मृतांचा आकडा 80 वर गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Coronavirus, Coronavirus cases, Pune