मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी, ठाकरे सरकारकडून लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा, 5 हजार कोटी करणार खर्च!

मोठी बातमी, ठाकरे सरकारकडून लवकरच मोफत लसीकरणाची घोषणा, 5 हजार कोटी करणार खर्च!

ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टय ठाकरे सरकारने आखले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टय ठाकरे सरकारने आखले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टय ठाकरे सरकारने आखले आहे.

मुंबई, 26 एप्रिल: कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी लसीकरणावर (corona vaccination) भर दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकारकडून (MVA Government) लसीकरणाची तयारी सुरू असून मोफत लस दिली जाणार असल्याची चर्चा आहे.  या लसीकरणावर राज्य सरकारकडून सुमारे 5.50 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे सरकारकडून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मोफत लस देण्याची योजना आखली जात आहे. या मोफत लसीकरण करण्यासाठी दर महिन्याला 2 कोटी लस विकत घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकार कोविड 19 संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी सुमारे साडेपाच हजार कोटी रूपये खर्च करणार आहे.  ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्टय ठाकरे सरकारने आखले आहे.

IPL 2021: ऋषभ पंतची 23 व्या वर्षीच कमाल, दिल्ली कॅपिटल्सकडून रचला इतिहास

तसंच, या मोहिमेत सीरम संस्थेकडे (Serum Institute of India) महिन्याला दीड कोटी कोविशिल्ड लशींची मागणी राज्य सरकारने नोंदवली असली तरी त्यांच्याकडून सुमारे 1 कोटी लशी मिळणार आहे.  त्याचबरोबर भारत बायोटेककडे (Bharat Biotech) महिन्याला 1 कोटी कोवॅक्सिन (Covaxin) लशींची मागणी नोंदवली आहे. पण भारत बायोटेककडून  सुमारे 50 ते 60 लाख लशी मिळणार आहे.

तर 50 ते 60 लाख लशी या आंतरराष्ट्रीय बाजारातून राज्य सरकार खरेदी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबद्दल लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिकृतरित्या घोषणा करणार आहे.

रेमडेसीवीर इंजेक्शनला केंद्राकडून कमी पुरवठा

दरम्यान, राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र व्यवहार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. पंतप्रधान मोदींनीही ही मागणी मान्य करत पुरवठा वाढवला होता.

रणवीर सिंगसुद्धा आहे कास्टिंग काऊचचा बळी; सांगितला धक्कादायक अनुभव

पण, केंद्र सरकारने राज्याला 21 एप्रिल ते 30 एप्रिल दर दिवशी 40 हजार रेमडीसीवीर देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात फक्त 26  हजार रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. कंपन्या किती इंजेक्शनचा साठा करत आहे. याविषयीच पत्र केंद्र सरकारला देत आहोत, अशी माहिती अन्न औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

राज्य सरकार पूर्वी कंपन्यांकडून थेट प्रतिदिवस 40 हजारांपेक्षा जास्त रेमडीसीवीर इंजेक्शन खरेदी करत होतो. आता हे अधिकार थेट केंद्र सरकारने घेतले आहेत. केंद्र सरकार सांगेल तेवढाच पुरवठा आता कंपन्या करीत आहे, अशी माहितीही शिंगणे यांनी दिली.

First published: