मृत्युंजय कुमार/रांची, 14 मार्च : नवरा-बायकोचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. नवरा शॉपिंगसाठी म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर त्याच्या बायकोने धक्कादायक पाऊल उचललं आहे. नवरा दुकानात सामान आणायला जाताच बायको नको तेच करून बसली. दुकानाहून घरी परताच पत्नीचं कृत्य पाहून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली तो पुरता हादरला. झारखंडमधील ही धक्कादायक घटना आहे.
बोकोरोतील न्यू कैलाश बिहार कॉलनीतील हे दाम्पत्य. सर्वेश्वर कुमार पांडे आणि त्याची पत्नी पूजा पांडे दोघंही भाड्याच्या घरात राहत होते. सर्वेश्वर सिक्युरिटी गार्डचं काम करतो. माहितीनुसार त्यांचं मूळ घर चासमधील पत्थरकट्टा साईटवर आहे. लग्नानंतर पत्नीचं सासरच्यांसोबत जमत नव्हतं. म्हणून दोघं नवरा-बायको भाड्याच्या घरात राहत होते.
धक्कादायक! रस्त्यावरील भटक्या Puppy ला नवऱ्याने घरी आणलं, बायकोचा मृत्यू; असं काय घडलं?
सर्वेश्वर कुमारने पोलिसांना सांगितल्यानुसार तो सकाळी दुकानात सामान आणायला गेला. घरी परतला तेव्हा त्याने दरवाजा ठोठावला. पण बायको दरवाजा काही उघडत नव्हती. शेवटी स्थानिकांच्या मदतीने त्याने दरवाजा तोडला. आता गेल्यावर त्याला जे दिसलं ते पाहूनच त्याला मोठा धक्का बसला. त्याच्या पत्नीचा मृतदेह लटकत होता. पूजाने साडीचा गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं.
पती सर्वेश्वरकुमार पांडेने सांगितलं, तो सकाळी दुकानात गेला होता. त्यानंतर घरी परतला तर पत्नीने स्वतःला संपवलं होतं. आमच्यात किरकोळ वाद व्हायचे. पण आज कोणतंच भांडण झालं नव्हतं. त्यामुळे पत्नीने असं टोकाचं पाऊल का उचललं हे माझ्याही समजण्यापलिकडचं आहे.
आता काय म्हणावं हिला! म्हणे, 'नवरा नको, स्मार्टफोन हवा'; मोबाईलवेड्या पत्नीने शेवटी पतीला....
पोलिसांना याची माहिती देण्यात आली. चास पोलीस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चास पोलीस ठाण्याचे एएसआय चंद्रदेव सिंह यांनी सांगितलं, विवाहितेने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालं. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. वेगवेगळ्या बाजूने प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Crime, Jharkhand, Local18, Wife and husband