जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पत्नीसोबत 63 वर्षीय वृद्धाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून संतापला पती, धक्कादायक शेवट!

पत्नीसोबत 63 वर्षीय वृद्धाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून संतापला पती, धक्कादायक शेवट!

पत्नीसोबत 63 वर्षीय वृद्धाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून संतापला पती, धक्कादायक शेवट!

वृद्धाचं (Crime News) आरोपी महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. त्या दिवशी तो रात्री उशिरा बागेत प्रेयसीला भेटायला गेला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 31 मे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) रीवामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. मृत वृद्धाचं (Crime News) आरोपी महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. त्या दिवशी तो रात्री उशिरा बागेत प्रेयसीला भेटायला गेला होता. येथे दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत महिलेच्या पतीने रंगेहाथ पकडलं. यानंतर पतीने रागाच्या भरात त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. (Husband gets angry after seeing 63 year old man in offensive condition with his wife ) प्राथमिक तपासात वृद्धाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय होता. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनंतर सत्य समोर आलं. यावेळी कळालं की, वृद्धाची हत्या (Murder) करण्यात आली. पोलिसांच्या सायबर सेलच्या मदतीने ते महिलेपर्यंत पोहोचले. आरोपी महिलेच्या पतीची पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा तो इतर गोष्टींबद्दल बोलत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, 63 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं प्रेम प्रकरण सुरू होतं. ज्या दिवशी तो घरी आला तेव्हा पती घरात नव्हती. मुलांनाही आईबद्दल काहीच माहिती नव्हती. शेवटी तो बागेच्या दिशेने गेला, येथे 63 वर्षीय राजकुमार मिश्रासोबत पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून तो संतापला. त्याने पत्नीच्या मदतीने राजकुमार मिश्राची हत्या केली. यानंतर दोघांनी मिळून मृतदेह लांब फेकून दिला. यानंतर मृतक व्यक्तीच्या गळ्यातील चैन, कॅश घेऊन पळ काढला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात