जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई : सीजन हॉटेलमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा कुजलेला मृतदेह, आई गंभीर जखमी; वडील फरार

मुंबई : सीजन हॉटेलमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा कुजलेला मृतदेह, आई गंभीर जखमी; वडील फरार

मुंबई : सीजन हॉटेलमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा कुजलेला मृतदेह, आई गंभीर जखमी; वडील फरार

हॉटेल स्टाफने डुब्लिकेट किल्लीने खोली उघडली. यानंतर खोलीतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मे : मुंबई (Mumbai News) जवळील काशी मीरा परिसरातील सीजन हॉटेलच्या खोलीतून 7 वर्षांच्या मुलीचा कुजलेला मृतदेह सापडला असून मुलीच्या आईची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी या कुटुंबाने वसई परिसरातील एक हॉटेल बुक (dead body of 7 year old girl at Season Hotel Mumbai) केलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून या कुटुंबातील एकही सदस्य खोलीच्या बाहेर आला नव्हता. याशिवाय या दिवसात कोणी त्यांना भेटायलाही आलं नव्हतं. आज सकाळी 10 वाजता या कुटुंबातील पुरुष सदस्य हॉटेलच्या बाहेर आला. यादरम्यान खोलीतून महिलेचा मदतीसाठी हाकेचा आवाज येत होता. ज्यानंतर हॉटेल स्टाफने डुब्लिकेट किल्लीने खोली उघडली. यानंतर खोलीतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. खोलीच दार उघडताच कर्मचाऱ्यांनी पाहिलं की, महिला गंभीरपणे जखमी झाली आहे. याशिवाय खोलीत खूप दुर्गेंधी पसरली आहे. जेव्हा हॉटेल स्टाफने लक्ष देऊन पाहिलं तर मुलीचा कुजलेला मृतदेह खोलीत होता. ज्यानंतर तातडीने हॉटेल स्टाफने काशी मारी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अद्याप महिला कोणताही जबाब देण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. मात्र अद्याप मुलीच्या हत्येचं गूढ उकलू शकलेलं नाही. महिलेची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिच या प्रकरणात घडलेला प्रकार सांगू शकेल, असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात