जयपूर, 14 जुलै : राजस्थानातील (Rajasthan News) बिकानेरमध्ये पत्नीने पतीला इतक्या क्रूरपणे मारहाण केली की त्याच्या डोक्याला 17 टाके (Crime news) लावण्यात आले. ही क्रूर पत्नी क्रिकेटच्या बॅटने बराच वेळ पतीच्या डोक्यावर आणि खाद्यांवर मारहाण करीत होती. पती दररोज दारू पिऊन तिला मारहाण (Wife beat husband) करीत होता, त्यामुळे संतापाच्या भरात पत्नीने पतीला मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात दोघांनी एकमेकांविरोधात एफआयआरही दाखल केली आहे.
ही घटना बिकानेर शहराजवळील रिडमलसर गावातील आहे. येथे मंगळवारी रात्री 11 वाजता पती-पत्नी अमीन (35) आणि अनीशा (30) यांच्या जोरजोरात झालेल्या आवाजानंतर शेजारी त्यांच्या घरी पोहोचले. येथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. अनीशा आपल्या पतीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करीत होती आणि अमीन आरडाओरडा करीत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, कुटुंबीयांनी तक्रारीत सांगितलं की, अनीशा बराच वेळ पतीला खांद्यावर आणि डोक्यावर बॅटने मारहाण करीत होती. यामुळे अमीनचं डोकं फुटलं आणि जमिनीवर रक्त सांडलं. अमीन जेव्हा झोपला होता, तेव्हा अनीशाने त्याच्यावर हल्ला केला. शेजारच्यांनी अनीशाला पकडून तिला रोखण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अमीन जखमी झाला आहे. त्याच्यावर बिकानेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्याला 18 टाके लागले आहेत.
पत्नीनेही पतीविरोधात गुन्हा केला दाखल… पत्नीचा आरोप आहे की, पती दररोज दारू पिऊन तिला मारहाण करीत होता. जेव्हा शेजारी अमीनला वाचवायला आले तेव्हा अमीशा म्हणत होती की, जेव्हा तिला मारहाण केली जात होती, तेव्हा कोणीच वाचवायला आलं नाही. यानंतर तिनेही पतीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.