मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बुलढाण्यातली लेडी किलर; एका प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराच्या वडिलांची हत्या

बुलढाण्यातली लेडी किलर; एका प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराच्या वडिलांची हत्या

बुलढाणा शहरालगत असलेल्या सुंदारखेड परिसरात जखमी अवस्थेत एका व्यक्ती आढळून आला होता.

बुलढाणा शहरालगत असलेल्या सुंदारखेड परिसरात जखमी अवस्थेत एका व्यक्ती आढळून आला होता.

बुलढाणा शहरालगत असलेल्या सुंदारखेड परिसरात जखमी अवस्थेत एका व्यक्ती आढळून आला होता.

  • Published by:  News18 Desk
राहुल खंदारे,  बुलढाणा, 11 जुलै : अनेक प्रियकर आणि प्रेयसी लग्न (Girlfriend Boyfriend Marriage) करण्याचा निर्णय घेतात. मात्र, अनेकदा प्रेमाला नकार दिल्यानंतर आत्महत्येच्या (Suicide) आणि हत्येच्या (Murder) देखील घटना घडल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून मात्र, एक भयानक घटना समोर आली आहे. (Murder in Buldana) येथे एका प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराच्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. (Girlfriend Killed Boyfriend Father) याप्रकरणी आरोपी महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - बुलढाणा शहरालगत असलेल्या सुंदारखेड परिसरात जखमी अवस्थेत एका व्यक्ती आढळून आला होता. या व्यक्तीचा 10 जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस तपासात या व्यक्तीचा खून झाल्याचे समोर आले आहे. एका प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराच्या वडिलांचा आरोपी महिलेने खून केल्याचे समोर आहे. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हेही वाचा - 'माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मी टाईमपास केला'; प्रियकराचं बोलणं ऐकताच तरुणीने उचललं भयानक पाऊल याच आरोपी महिलेने 2020 मध्ये तिच्या नवऱ्याचाही खून करून शेतात पुरले होते. याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद काटकर यांनी सांगितले. तर एका प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराच्या वडिलांचा आरोपी महिलेने खून केल्याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
First published:

Tags: Crime news

पुढील बातम्या