जमुई, 12 जुलै : सोशल मीडियाचे (Social Media Platforms) वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरून लोक आपले ज्ञान वाढवत आहेत. मात्र, दुसरीकडे त्याचा चुकीचा वापर कुटुंब आणि समाजासाठीही घातक ठरतो. अनेकदा अशी प्रकरणे समोर येतात, ज्यामुळे कुटुंब तुटते आणि ते समाजासाठी योग्य नसते. (Social Media Disadvantage) असेच एक प्रकरण बिहारमधील जमुई जिल्ह्यातील एका गावातून समोर आले आहे, जिथे दोन मुलांच्या 35 वर्षांची आई 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली. (Woman Extra Marital Affair) काय आहे संपूर्ण प्रकरण - बिहारच्या जमुईमध्ये एक 35 वर्षांची महिला 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडल्याचे समोर आले आहे. (Woman Affair from Facebook) दोघांमधील प्रेम इतकं वाढलं की महिलेने हा मुलगाा आपल्या माहेरचा असल्याचा बहाणा करुन प्रियकर मुलाला घरातच थांबवले. त्यानंतर रात्रीच्या अंधारात तिच्या पतीने महिलेला मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. यानंतर गदारोळ झाला आणि गावातील मंदिरासमोर दोघांनाही जाहीरपणे मारहाण करण्यात आली. या प्रकरणी महिलेला आणि तिच्या 15 वर्षीय प्रियकराला पती आणि ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना जमुई जिल्ह्यातील नगर पोलीस ठाण्याच्या हरला गावातील आहे. जमुई येथे राहणार्या 35 वर्षांच्या मुलांची आई, फेसबुक मेसेंजरवर चॅट करत असताना, जेहानाबादमध्ये राहणाऱ्या दहावीचा विद्यार्थी असलेल्या 15 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली. ही महिला मेसेंजरवर तासनतास व्हिडिओ चॅट करत असे. दरम्यान, रविवारी महिलेने या मुलाला आपल्या घरी बोलावून माहेरचा रहिवासी असल्याचे सांगून आपल्या घरात राहायला लावले. दरम्यान, रात्री उशिरा या महिलेचे मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. याचदरम्यान महिलेच्या पतीने दोघांना पाहिले. हेही वाचा - स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी पोटच्या गोळ्यालाही सोडलं नाही; 5 दिवसांच्या बाळासोबतच आईचं धक्कादायक कृ्त्य मग गावातील मंदिरासमोर पती आणि ग्रामस्थांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला प्रियकर मुलाला आपल्या कुशीत वाचवत आहे आणि तिचा नवरा दोघांना लाठ्या-ठोक्यांनी मारहाण करत आहे. मारहाणीची बाब संपूर्ण गावासमोर दोघांच्याही निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी व घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिकांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण शांत झाले. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.