जयपूर 13 सप्टेंबर : जोधपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या फलोदी शहरात एका शिक्षकाचं राक्षसी कृत्य समोर आलं आहे. शिक्षकाने पत्नी आणि मुलीला बेदम मारहाण केली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षकाने मारहाण केल्यानंतर पत्नीला अर्धनग्न अवस्थेत उन्हात बसवलं आणि स्वतः घरामध्ये जेवायला बसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. मुस्लीम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरुणाची हत्या करून मृतदेह नदीत फेकला, आरोपींची कबुली यासोबत पीडितेच्या माहेरच्या लोकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. फलोदीचे पोलीस अधिकारी राकेश ख्यालिया यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि खाजगी शाळेतील शिक्षक कैलाश सुथार याला अटक केली. सध्या त्याला शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शिक्षकाची पत्नी आणि मुलीलाही महिला पोलिसांनी विचारणा केली, की याप्रकरणी तुम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे की नाही? गुन्हा दाखल केल्यास इतर कलमे जोडली जातील, असं त्यांनी सांगितलं. कैलासने पत्नीला बेदम मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. बचावासाठी आलेल्या मुलीलाही त्याने मारहाण केली. यानंतर त्याने पत्नीच्या अंगावरील कपडे फाडून तिला मोकळ्या अंगणात उन्हात बसवलं. अर्धनग्न अवस्थेत पत्नी उन्हात बसून रडत राहिली, तर कैलास घरातच जेवण करत बसला. सख्ख्या बापाकडूनच तरुण मुलीचे लैंगिक शोषण; पुण्यातील धक्कादायक घटना आरोपी कैलासचं म्हणणं आहे की, मला माझ्या पत्नीला केलेल्या मारहाणीचा पश्चाताप होत आहे. मी असं करायला नको होतं. पत्नीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा त्याचा दावा आहे. मी तिच्यावर उपचार करून थकलो आहे. अशा परिस्थितीत घरात तणावाचं वातावरण होतं. या टेन्शनमध्ये मी हे सगळं केलं असल्याचं कैलास म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.