पुणे, 12 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यातही बलात्कार, लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. आता बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
ही संतापजनक घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम पित्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पित्याचे वय 51 इतके आहे. तर पीडित तरुणीचे वय 19 आहे. मिळाळेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आणि तिचे वडील असे दोघेच घरात होते. त्यावेळी आरोपी नराधम पित्याने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले.
तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीने कशीबशी आपली सुटका करून घेतली. तिथून सुटका केल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली. तसेच घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. अखेर चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी नराधम पित्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भाजपचे नेत्याच्या फार्महाऊसवर घडली घटना, आरोपी अटकेत
नाशकातही पारिचकेवर अत्याचार -
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे एका खासगी रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली. पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याने पीडितेच्या रूममध्ये प्रवेश केला. तसेच माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असे सांगत रूममध्ये प्रवेश केला. यानंतर पीडितेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर बळजबरी करत शारीरिक अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेने केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune