जुगल कलाल/जयपूर, 10 मार्च : आपला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेली की आपण पोलीस ठाण्यात त्याची तक्रार देतो. पण ते परत मिळतील याची आशा आपल्याला नसते. असेच तब्बल 6 लाख रुपये किमतीचे मोबाईल ज्यापैकी काही हरवले होते तर काही चोरीला गेले होते. पण हे मोबाईल आता पोलिसांकडे आहेत. आपले मोबाईल पोलिसांकडे पाहून मोबाईल फोनचे मालकही चक्रावले आहेत. राजस्थानच्या डुंगरपूर पोलिसांकडे 6 लाख रुपये किमतीचे मोबाईल होते. डूंगरपुर एसपी कुंदन कवरिया यांनी सांगितलं, हरवलेले, चोरीला गेलेले 200 मोबाईल शोधण्याचं टार्गेट होतं. यासाठी सायबर टिमने बरीच मेहनत घेतली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील चोरल्या गेलेल्या आणि हरवलेल्या मोबाईलची यादी तयार केली. यात महागडे आणि अँड्रॉईड फोन होते. IMEI नंबरवरून हे मोबाईल ट्रेस करण्यात आले. पोटच्या मुलांसोबत आईचंच 2 महिने भयंकर कृत्य; अटकेवेळीही सोडली लाज, पोलिसांकडे भलतीच डिमांड 40 मोबाइल फोन ट्रेस झाले. मोबाईल फोन ट्रेस झाल्यानंतर त्यावर फोन करून ते एसपी ऑफिसमध्ये जमा करण्यात सांगण्यात आले होते. त्यामुळे काही लोकांनी मोबाईल स्वतः पोलीस ठाण्यात येऊन जमा केले. पोलिसांनी गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोबाईल कलेक्ट केले. हे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना परत देण्यात आले आहेत.
पोलिसांनी हे मोबाईल त्यांच्या मालकांना परत केले आहेत. आपले मोबाईल पाहून मालकांनाही विश्वास बसत नव्हता. त्यांना आपला आनंदही व्यक्त करता येत नव्हता. पोलिसांच्या प्रयत्नामुळे या मालकांच्या चेहऱ्यावर मोबाईल परत मिळाल्याचा आनंद झळकला. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. मोबाईलचे मालक म्हणाले, की त्यांना मोबाईल पुन्हा मिळेल याची आशा नव्हती. काही लोकांना तर त्यांना मोबाईल होता तसाच्या तसा मिळाला आहे.

)







