वॉशिंग्टन, 10 मार्च : आई जिचा जीव तिच्या मुलांमध्येच असतो. मुलांसाठी ती आपला जीवही धोक्यात घालते. पण एक महिला आईच्या नावाला कलंक बनली आहे. तिने आपल्या मुलांचा भयंकर छळ केला. इतकंच नव्हे तर या आरोपात अटक होत असताना तिने निर्लज्जपणाचा कळसच काढला. अटक होताना पोलिसांकडे तिने लिपस्टिक मागितली. महिलेचं लज्जास्पद कृत्य पाहून पोलीसही हैराण झाले.
टेक्सासमध्ये राहणारी रॅवेन याट्स, जिच्यावर आपल्या मुलांना छळल्याचा आरोप आहे. तिला 12 वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. तिने तिने आपल्या दोन्ही मुलांना खाणंपिणं न देता घरात लॉक करून ठेवलं होतं. एक-दोन तास किंवा दिवस नव्हे तर तर तब्बल 2 महिने तिने त्यांना घरात कोंडलं होतं. त्यादरम्यान ती आपल्या एका मित्रासोबत राहत होती.
एका दिवसातच नवरदेवाने आटोपला हनीमून, घरी परतताच नवरीबाईची पोलिसात धाव; FIR दाखल
माहितीनुसार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रॅवेनने आपल्या मुलांना घरात लॉक केलं होतं. तिच्या घरात कोरड्या मसाल्यांसह दुसरं काहीच नव्हते. महिलेने आपल्या मोठ्या मुलीला धमकी दिली होती की जर त्यांनी कुणाला आपण दोघं घरात एकटे आहोत असं सांगितलं तर तर त्याचे वडील भावाला एकटं सोडून त्याला घेऊन जातील.
जेव्हा भूक लागली तेव्हा मुलीने आपल्या वडिलांना फोन करून जेवण ऑर्डर करायला सांगितलं. जेव्हा तिने आई कामात बिझी असल्याचं वारंवार सांगितलं तेव्हा तिच्या वडिलांना संशय आला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तेव्हा दोन्ही मुलं दोन महिन्यांपासून घरात एकटी राहत असल्याचं समजलं.
महिला पोलिसांपासून दूर पळत होती पण अखेर ती पोलिसांच्या ताब्यात सापडलीच. 8 मार्चला तिला अल्बामाहून अटक करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे जेव्हा तिला पोलिसांनी अटक केली तेव्हा तिने पोलिसांकडे लिपस्टिक मागितली.
हरवलेले, चोरीला गेलेले 6 लाख रु. किमतीचे मोबाईल पोलिसांकडे; पाहून फोनचे मालकही चक्रावले
पोलीस प्रमुख स्टेफन कार्लिस्ले यांनी सांगितलं की ती हसत हसत अटक झाली. बेड्या घालताना तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू होतं. मुलांसोबत तिने जे काही केलं त्याचा तिला बिलकुल पश्चाताप नव्हता. तिने आपल्या मुलांसोबत जे केलं त्यामुळे त्यांचा जीवही गेला असता. पण तरी या महिलेला अटक होताना सुंदर आणि आकर्षक दिसायचं होतं. ती कॅमेरा पाहून अटक होत होती. सर्वात धक्कादायक म्हणजे तिने एका पोलिसाकडेच लिपस्टिक मागितली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Parents and child, Viral, World news