जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / भीषण अपघातातून तरुण बचावला, मात्र काही क्षणात दुसरं संकट कोसळलं अन् गेला जीव; हृदय पिळवटून टाकणारी घटना

भीषण अपघातातून तरुण बचावला, मात्र काही क्षणात दुसरं संकट कोसळलं अन् गेला जीव; हृदय पिळवटून टाकणारी घटना

भीषण अपघातातून तरुण बचावला, मात्र काही क्षणात दुसरं संकट कोसळलं अन् गेला जीव; हृदय पिळवटून टाकणारी घटना

जळगावमधून भिषण अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील खोटे नगर, वाटीकाश्रम परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भरधाव आयशरने दुचाकीला धडक दिली.

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

जळगाव, 7 जानेवारी :  जळगावमधून भिषण अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील खोटे नगर, वाटीकाश्रम परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भरधाव आयशरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. मात्र त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या पुढच्या चाकाखाली आल्यानं 30 वर्षीय तरुण जागीच ठार झाला . तर दुचाकीवर असलेल्या त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रशांत भागवत तायडे असं मृत तरुणाचं नाव आहे. तर जयेश द्वारकानाथ पाटील हा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. महामार्गावर अपघात   घटनेबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत तायडे आणि जयेश पाटील हे दोघे मित्र रावेर तालुक्यातील गहुखेडा येथून दुचाकीने बांभोरीकडे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास खोटे नगर जवळील  वाटिकाश्रम परिसरात राष्ट्रीय महामार्गावर भरधाव आयशरने दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर पडले. हेही वाचा :  आणखी एक हादरवणारं कांड! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले अन्…, धक्कादायक कारण समोर ट्रॅक्टर अंगावरून गेल्यानं मृत्यू   तेवढ्यात समोरून खडीने भरलेला ट्रॅक्टर येत होता. या ट्रॅक्टरचे समोरचे चाक प्रशांत तायडे याच्या डोक्यावरून गेल्यानं या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जयेश पाटील हा या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात