अहमदाबाद 30 ऑगस्ट : सूरत पोलिसांनी एका मुस्लीम महिला आणि तिच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या महिलेनं भावासोबत मिळून जून महिन्यात आपल्या पतीला आत्महत्या करण्या प्रवृत्त केल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तपासात समोर आलं की या दोघांनीही मृत हिंदू व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देत गोमांस खाण्यास भाग पाडलं होतं.
मृत रोहित सिंहने फेसबुकवर पोस्ट केलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, त्याची पत्नी सोनम अली आणि तिचा भाऊ मुख्तार अली यांनी त्याला गोमांस न खाल्ल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडलं. सिंह यांचा मृतदेह 27 जून रोजी पंख्याला दुपट्ट्याने लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
27 वर्षीय रोहित सोनमसोबत राहत होता कारण त्याचं कुटुंब त्यांच्या नात्याला विरोध करत होतं. न्यूज18 गुजरातच्या वृत्तानुसार, सोनमचं आधीच लग्न झालं होतं. तुला तिच्यासोबत लग्न करायचं असेल तर आमच्यासोबत राहू नकोस, असं कुटुंबीयांनी रोहितला सांगितलं होतं. त्यामुळे ते सोनमसोबत राहात होते.
पत्नीचा एकतर्फी प्रियकर जीवावर उठला, मुंबईच्या खार सबवेवर थरार, निरापराध पतीसोबत हे काय घडलं?
रोहित सिंह यांच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नव्हती. काही महिन्यांनंतर, रोहितच्या भावाला सोशल मीडियावरील मित्राद्वारे रोहितच्या मृत्यूची माहिती मिळाली. रोहितच्या फेसबुक प्रोफाईलवर सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे त्याच्या आईने उधना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आईने सांगितलं की तिचा तिच्या मुलाशी कोणताही संपर्क नव्हता आणि तिला त्याच्या ठावठिकाणाबद्दल काहीही माहिती नव्हती. रोहित आणि सोनमचं लग्न झालं असल्याची शक्यताही कमी असल्याचं तिने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Suicide news