जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पत्नीचा एकतर्फी प्रियकर जीवावर उठला, मुंबईच्या खार सबवेवर थरार, निरापराध पतीसोबत हे काय घडलं?

पत्नीचा एकतर्फी प्रियकर जीवावर उठला, मुंबईच्या खार सबवेवर थरार, निरापराध पतीसोबत हे काय घडलं?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मुंबई, 28 ऑगस्ट : मुंबई शहर एका हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. खार सबवेजवळ एका व्यक्तीच्या मान आणि हातावर चाकू हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत खार सबवेजवळ पडली होती. या दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकी चालकाची नजर या व्यक्तीवर पडली होती. दुचाकीस्वाराने तातडीने जखमी व्यक्तीला जवळील रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात नेल्यानंतर जखमी व्यक्तीची प्राणज्योत मालवली. या घटनेप्रकरणी मृतक व्यक्तीच्या पत्नीने वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मृतकाच्या पत्नीने या हत्येच्या घटनेप्रकरणी तिच्या महाविद्यालयीन मित्रावर गंभीर आरोप केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 ऑगस्ट : मुंबई शहर एका हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. खार सबवेजवळ एका व्यक्तीच्या मान आणि हातावर चाकू हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत खार सबवेजवळ पडली होती. या दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकी चालकाची नजर या व्यक्तीवर पडली होती. दुचाकीस्वाराने तातडीने जखमी व्यक्तीला जवळील रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात नेल्यानंतर जखमी व्यक्तीची प्राणज्योत मालवली. या घटनेप्रकरणी मृतक व्यक्तीच्या पत्नीने वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मृतकाच्या पत्नीने या हत्येच्या घटनेप्रकरणी तिच्या महाविद्यालयीन मित्रावर गंभीर आरोप केला आहे. आपल्या कॉलेजमधील मित्रानेच पतीची हत्या केल्याचा दावा महिलेने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेवून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना ही खार सबवेजवळ शुक्रवारी (27 ऑगस्ट) रात्री घडली होती. परवेज बशीर खान असं मृतक 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. परवेज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शहाजहान यांनी त्यांच्या महाविद्यालयीन मित्र अकील सय्यद (वय 40) याच्यावर आरोप केला आहे. अकील यानेच आपल्या पतीची चाकूने भोसकून हत्या केली, असा आरोप महिलेने केला आहे. ( जळगाव : कारच्या शर्यतीमुळे एकुलत्या एक मुलाचा मृत्यू, तब्बल 15 फूट फेकला गेला 11 वर्षाचा चिमुरडा ) शहाजहानने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अकिल सय्यद याने परवेज यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अकील हा महाविद्यालीयन मित्र असल्याने शहाजहानसोबत संपर्कात होता. गेल्या काही दिवसांपासून तो महिलेला लग्नासाठी सारखा विचारत होता. पण शहाजहानने लग्नास नकार दिला होता. शहाजहान यांनी लग्नाला नकार दिल्याने अकील संतापला होता. त्याने शहाजहान आणि तिच्या मुलांचं अपहरण करण्याची आणि परवेज यांच्या हत्येची धमकी दिली होती. त्यामुळे महिला घाबरली होती. शहाजहानने गेल्या आठवड्यात ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्यात अकिलविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती. अखेर या प्रकरणातला वाद वाढल्यानंतर परवेज यांची हत्या करण्यात आली. परवेज यांच्यावर खार सबवेजवळ हल्ला करण्यात आला. ते जखमी अवस्थेत खार सबवे इथे जखमी अवस्थेत पडले होते. यावेळी एका दुचाकीस्वाराची त्यांच्यावर नजर गेली. त्याने तातडीने जखमी परवेज यांनी व्हीएन देसाई रुग्णालयात नेले. पण उचारादम्यान परवेज यांचा मृत्यू झाला. संबंधित घटनेप्रकरणी वाकोला पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रदिप मोरे यांनी आरोपी अकिलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , Murder
  • First Published :
जाहिरात
जाहिरात