नवी दिल्ली 30 ऑगस्ट : माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आणि भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्यावर त्यांची मोलकरीण सुनीताने गंभीर आरोप केला आहे. सुनीताने सांगितलं की, सीमा पात्रा यांनी तिच्यावर लोखंडी वस्तूने वार करून तिचे दात तोडले आहेत. गरम तव्याने तिच्या शरीराच्या अनेक भागावर चटके दिले, ज्याच्या खुणा शरीरावर अजूनही आहेत. तिने सांगितलं की मॅडमचा मुलगा आयुष्मानने तिला या सगळ्यातून वाचवलं. आज ती त्याच्यामुळेच जिवंत आहे.
Sonali Phogat Murder Case: 12 हजारांच्या ड्रग्जने घेतला सोनालीचा जीव! असा आखला कट
सुनीताच्या म्हणण्यानुसार तिला एका खोलीत बंद केलं गेलं होतं. तिला कित्येक दिवस खायला प्यायलाही दिलं नाही, त्यामुळे ती खूप अशक्त झाली. सुनीताने सांगितलं की, तिला व्यवस्थित उभा राहता येत नसतानाही तिला काम करायला लावलं होतं. पोलिसांनी सुटका केल्यानंतर सुनीतावर सध्या रिम्समध्ये उपचार सुरू आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा तिला रुग्णालयात आणलं तेव्हा ती खूप अशक्त होती, हळूहळू तिची शारीरिक स्थिती सुधारेल.
अर्गोराचे एसएचओ विनोद कुमार यांनी सांगितलं की, पीडिता अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. ती बरी झाल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवला जाईल. तिच्या वक्तव्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून अद्यापही सुरू आहे.
काँग्रेस आमदार दीपिका सिंह पांडे यांनी ट्विटद्वारे भाजपला घेरलं आहे. भाजपच्या बड्या नेत्यांना टॅग करत त्यांनी लिहिलं की, 'धिक्कार आहे तुमच्या नेत्या सीमा पात्रा यांचा, ज्यांनी ओलीस ठेवलेल्या महिलेसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिची कहाणी शब्दात वर्णन करता येणार नाही. पावर आणि पैशाच्या गर्वात या मुलीचे दात तोडले, तिच्या अंगावर गरम तव्याचे चटके दिले. अपमानास्पद वागणूक दिली. स्मृती इराणी कुठे आहेत, भाजपचा महिला मोर्चा का झोपला आहे? एक गरीब आदिवासी मुलगी तुमच्यासाठी मुलगी नाही का? रस्त्यावर उतरा आणि या महिलेसाठी कठोर शिक्षेची मागणी करा. महिला आयोग या महिलेच्या विरोधात कारवाई का करत नाही?'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking news