मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शीर घेऊन लोकल अंबरनाथ यार्डात तर धड सापडले उल्हासनगर स्टेशनजवळ, थरारक घटना

शीर घेऊन लोकल अंबरनाथ यार्डात तर धड सापडले उल्हासनगर स्टेशनजवळ, थरारक घटना

उल्हासनगर रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर शीर नसलेले धड पोलिसांना आढळून आले...

उल्हासनगर रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर शीर नसलेले धड पोलिसांना आढळून आले...

उल्हासनगर रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर शीर नसलेले धड पोलिसांना आढळून आले...

अंबरनाथ, 24 मार्च :  अंबरनाथ रेल्वे (Ambernath railway station) स्थानकाच्या यार्डात असलेल्या लोकल डब्यात धड नसलेले शीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईहुन (Mumbai) आलेली लोकल अंबरनाथ रेल्वे स्थानकात सायडिंगला गेली होती. त्यानंतर ही घटना समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उजेडात आली. मुंबईहून एक लोकल यार्डात सायडिंगला लागली होती.  त्याचवेळी लगेजच्या डब्यात एका तरुणाचे धड नसलेले शीर आढळल्याचे स्टेशन मास्टरांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी अंबरनाथ यार्डात जाऊन शीर ताब्यात घेत व्यक्तीचे धड शोधायला सुरुवात केली. रात्री उशिरापासून रेल्वे पोलिसाचे पथक अंबरनाथ आणि उल्हासनगर रेल्वे रुळांलगत मृत व्यक्तीचे धड शोधत होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात Double Mutant Variant; काय आहे हा प्रकार?

रेल्वे पोलिसांनी रेल्वेचा पूर्ण परिसर पिंजून काढला मात्र या ठिकाणी हत्या केला संबंधीचा कोणताही पुरावा रेल्वे पोलिसांना आढळून आला नाही. याच दरम्यान अंबरनाथ उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये शोध घेत असतांना सकाळी साडेसातच्या सुमारास एक व्यक्तीचे धड पोलिसांना आढळले.

उल्हासनगर रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर शीर नसलेले धड पोलिसांना आढळून आले, मात्र जी सायडिंगला गेलेली लोकल होती. त्या लोकांच्या डब्यावर पोलिसांना रक्त आढळून आले, शिवाय शीर आणि धड ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह आणि शिरावर अपघाताच्या जखमा दिसून आल्या. त्याच बरोबर ज्या खांबाला मृताचे डोके आदळले होते, त्या खांबाला रक्त आणि मृताचे केस आढळून असल्याचे रेल्वे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी सांगितले.

Mansukh Hiren death प्रकरणाचा तपास NIA कडे द्या, ठाणे कोर्टाच्या ATS ला आदेश

तसंच रेल्वे पोलीस तपास करत असताना फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड देखील या ठिकाणी मागविण्यात आला होता. मात्र त्यांच्याही तपासात हा अपघात असल्याचं प्रथमदर्शनी समोर आले आहे. या संबंधी अधिक तपास केला असता. मृत व्यक्तीचे नाव हितेंद्र राजभर असल्याचे समोर आले आहे. हितेंद्र उल्हासनगर रेल्वे स्थानकातून मध्यरात्री 12.20ची शेवटच्या लोकलमध्ये चढला होता. यावेळी तो दरवाजात उभा असताना त्याचे डोके रेल्वे रुळाजवळील असलेल्या खांबाला आदळले. यात त्याचे शीर लोकलच्या डब्यात राहिले आणि धड उल्हासनगर स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला पडले होते, अशी माहिती रेल्वे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी दिली. मृताच्या भावाला घटनास्थळी बोलवल्या नंतर त्याच्या कडून मृतदेहाची ओळख पटली आहे. ही हत्या नसून रेल्वे अपघात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सध्या रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Ulhasnagar news