चंदीगड, 29 ऑगस्ट : टिकटॉक स्टार सोनाली फोगट खून प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगटची हत्या 12 हजार रुपयांच्या ड्रग्जने करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनालीचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे. दुसरीकडे सोनालीचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी सोनालीला बळजबरीने एमडी ड्रग्ज पाण्यात मिसळून दिले होते. एमडी ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे सोनालीचा मृत्यू झाला होता.
ड्रग्जचा ओव्हरडोस
त्याचवेळी, 22 ऑगस्ट रोजी सोनाली आणि दोन्ही आरोपी दुपारी 4 वाजता गोव्यात पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. सायंकाळी 6 वाजता सांगवान आणि सुखविंदर यांनी 5 हजार आणि 7 हजार किमतीचे वेगवेगळे एमडी ड्रग्ज खरेदी केले. रात्री 9.30 वाजता हॉटेलमधून सर्वजण कर्लीज पबला पोहोचले. 10 वाजल्यापासून सोनालीला हळूहळू ड्रग्ज देण्यास सुरुवात झाली. दुपारी दीड वाजता सोनालीची प्रकृती बिघडली. सोनालीला उलट्या होत असल्याने सांगवानने तिला वॉशरूममध्ये नेले.
बहिणीवर इंजिनिअर भावाकडून लैंगिक अत्याचार; मारहाण करत जीवे मारण्याचीही धमकी
सोनाली दुपारी 2 ते पहाटे 4 वाजेपर्यंत वॉशरूममध्ये होती. त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. सकाळी 6 वाजता (23 ऑगस्ट) सोनालीला बेशुद्ध अवस्थेत कर्लीज येथून हॉटेल लिओनी येथे आणण्यात आले. सकाळी 6.30 वाजता सांगवान आणि सुखविंदर यांनी सोनालीला गाडीत बसवून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. सायंकाळी 7.15 च्या सुमारास ते रुग्णालयात पोहोचले. पूर्ण तपासणी केल्यानंतर सोनालीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींना बेड्या
सोनालीची पूर्ण तपासणी झाल्यानंतर रुग्णालयाने सकाळी 9 वाजता गोवा पोलिसांना संपूर्ण माहिती दिली, त्यानंतर गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. टिकटॉकने प्रसिद्ध झालेल्या 42 वर्षीय सोनाली फोगटचा या आठवड्याच्या सुरुवातीला गोव्यात रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये फोगटचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान, दुसरा सहकारी सुखविंदर सिंग, 'कर्लीज' रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स आणि कथित ड्रग तस्कर रामा उर्फ रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.