कुशीनगर, 26 नोव्हेंबर : देशात अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंधातून हत्येच्या, आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. याच्याशीच संबंधित आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामीच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मामाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या तरुणावर त्याच्या मामीचेही प्रेम असून तीसुद्धा त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. दोघांनी मिळून हा कट रचला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
13 नोव्हेंबरला आपल्या मित्राच्या मदतीने मामाची हत्या केली. तर गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केली. यानंतर पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याचा खुलासा केला. मामीच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने मामीच्या मदतीने मामावर गोळ्या झाडून हत्या केल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या सर्वांवर 25 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. याप्रकरणी मृताच्या पत्नीसह सर्व दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विद्यासागर असे मृताचे नाव आहे. कुशीनगर जिल्ह्यातील तराया सुजान पोलीस स्टेशन हद्दीतील अहिरौली दान गावातील ते रहिवासी होता. अहिरौलीदन रोडवर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलीस पथक तयार करून घटनेचा उलगडा करण्याचे आदेश दिले होते. हत्येनंतर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले. पोलिसांनी मृताच्या पत्नीची कडक चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण समोर आले.
मृताच्या पत्नीने सांगितले की, तिचे तिच्याच भाच्यासोबत प्रेमसंबंध होते. तिला आणि तिचा भाचा रवी या दोघांनाही लग्न करायचे होते. पण त्या लग्नात तिचा पती विद्यासागर अडथळे निर्माण करत होता. त्यानंतर तिने रवीशी बोलून पतीच्या हत्येचा कट रचला.
हेही वाचा - पतीच्या त्रासामुळे ठेवले पोलीस कॉन्स्टेबलशी संबंध, पुढे महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार
बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी असलेल्या आरोपी रवी उर्फ रविरंजन याने आपला मित्र रोहित याला सोबत घेऊन या महिन्याच्या 13 तारखेला आपल्या मामा विद्यासागर याची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेची माहिती देताना एसपी धवल जयस्वाल म्हणाले की, पोलिसांनी हत्येची घटना घडवून आणणाऱ्या चोरट्यावर 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. गुप्तचराच्या माहितीवरून रात्री चकमक झाली, ज्यामध्ये मारेकऱ्याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली, यासोबतच मृताच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Up crime news, Women extramarital affair