जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पतीच्या त्रासामुळे ठेवले पोलीस कॉन्स्टेबलशी संबंध, पुढे महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

पतीच्या त्रासामुळे ठेवले पोलीस कॉन्स्टेबलशी संबंध, पुढे महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

आरोपी

आरोपी

पीडित महिला दोन मुलांची आई असल्याचे सांगण्यात येत आहे. तिला पतीसोबत त्रास होत होता त्यामुळे ती आरोपी कॉन्स्टेबलच्या संपर्कात आली.

  • -MIN READ Madhya Pradesh
  • Last Updated :

रीवा, 25 नोव्हेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने देशात खळबळ उडालेली असतानाच इतरही ठिकाणांकडून धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष देऊन 2 मुलांच्या आईसोबत पोलीस कॉन्स्टेबलने शारिरीक संबंध ठेवले. काय आहे संपूर्ण प्रकरण - मध्य प्रदेशातील रेवाच्या पोलीस लाईनमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलपुष्पेंद्र साकेतने लग्नाचे आमिष देत दोन मुलांच्या आईसोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर त्याने महिलेशी लग्नाला नकार दिला. त्यामुळे महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस पथकाने आरोपी हवालदाराविरुद्ध 376 चा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. यासोबतच पोलीस अधीक्षक नवनीत भसीन यांनी आरोपी कॉन्स्टेबलला निलंबितही केले होते. कॉन्स्टेबल पुष्पेंद्र साकेतचा या महिलेशी संपर्क होता, त्यानंतर त्याने लग्नाच्या बहाण्याने महिलेचे शारीरिक शोषण केले. नंतर त्याने लग्नास नकार दिल्याने महिलेने पोलीस ठाणे गाठून आरोपी हवालदाराविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर महिला ठाणे पोलिसांनी आरोपी हवालदार पुष्पेंद्र साकेत याच्याविरुद्ध कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. हेही वाचा -  आणखी एक ‘श्रद्धा’! विवाहित मुस्लीम तरुणाने युवतीला फसवलं, बोलणं बंद करताच भयानक कांड पीडित महिला दोन मुलांची आई असल्याचे सांगण्यात येत आहे. तिला पतीसोबत त्रास होत होता त्यामुळे ती आरोपी कॉन्स्टेबलच्या संपर्कात आली आणि त्यानंतर दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. आरोपी कॉन्स्टेबलने महिलेला लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवत तिचे शोषण केले आणि नंतर त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे दुखावलेल्या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली आहे. दरम्यान, पोलीस हवालदार पुष्पेंद्र साकेत हा पोलीस लाईनमध्ये नियुक्ती होण्यापूर्वी शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तैनात होता. याठिकाणी त्याच्यावर अनेक भ्रष्टाचार केल्याचे आरोप लागले होते. यानंतर त्याला पोलीस लाईन येथे तैनात करण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात