मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तरुणीचा दिवाळीच्या दिवशीच ट्रेनमध्ये गळफास, आत्महत्येनंतर मन हेलावून टाकणारं कारण समोर

तरुणीचा दिवाळीच्या दिवशीच ट्रेनमध्ये गळफास, आत्महत्येनंतर मन हेलावून टाकणारं कारण समोर

वलसाड रेल्वे स्थानकावर तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता

वलसाड रेल्वे स्थानकावर तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता

आत्महत्या करणारी तरुणी खूप हुशार होती. तिचं नाव इयत्ता दहावीत मेरिट लिस्टमध्ये (Merit List) आलं होतं. पण तिच्या आयुष्यात दिवाळीच्या (Diwali) दिवसांमध्ये जी घटना घडली त्यामुळे ती पूर्णपणे खचली. त्यातून तिने स्वत:चं आयुष्य संपविण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

पुढे वाचा ...
  गांधीनगर, 15 नोव्हेंबर : आपल्या आयुष्यात असलेल्या कोणत्याही समस्यांवर आत्महत्या (Suicide) हा उपाय नाही. त्यामुळे आत्महत्या करु नका, असं आवाहन करणाऱ्या किंवा नैराश्यात (Depression) असलेल्यांना प्रोत्साहन (Motivate) देणाऱ्या सामाजिक संस्थेमध्ये (NGO) कार्यरत असलेल्या एका तरुणीनेच ट्रेनमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आत्महत्या करणारी तरुणी खूप हुशार होती. तिचं नाव इयत्ता दहावीत मेरिट लिस्टमध्ये (Merit List) आलं होतं. पण तिच्या आयुष्यात दिवाळीच्या (Diwali) दिवसांमध्ये जी घटना घडली त्यामुळे ती पूर्णपणे खचली. त्यातून तिने स्वत:चं आयुष्य संपविण्याचं टोकाचं पाऊल उचललं. सुरुवातीला या तरुणीने आत्महत्या का केली? याची माहिती उलगडत नव्हती. पण पोलिसांच्या (Police) हाती जेव्हा तिची डायरी लागली तेव्हा तिच्यावर दोन नराधमांकडून सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली.

  नेमकं प्रकरण काय?

  दिवाळीच्या दिवशी 4 नोव्हेंबरला गुजरात क्वीन एक्सप्रेस वलसाड रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. या गाडीत कोच नंबर डी-12 मध्ये स्वच्छता कर्मचारी साफसफाई करत असताना त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह दिसतो. तो तातडीने याबाबतची माहिती वलसाडच्या स्टेशन मास्ट आणि रेल्वे पोलिसांना देतो. वलसाड पोलिसांना त्यावेळी मुलीच्या मृतदेहासोबत तिचं तिकीट मिळत नाही. पण तिच्या बॅगेत पोलिसांना मोबाईल सापडतो. त्या मोबाईलच्या माध्यमातून पोलिसांनी तिच्या कुटुंबियांशी संपर्क केला. त्यातून मुलगी मुळची वलसाडची असून ती बडोद्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तसेच ती बडोद्यातील मुलींच्या वस्तीगृहात राहत होती, अशी माहिती समोर आली. हेही वाचा : लग्न पाच दिवसांवर असताना मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, पित्याचं टोकाचं पाऊल पोलीस तपासासाठी मृतक मुलीच्या घरी गेले तेव्हा पोलिसांना तिची डायरी मिळाली. त्यामध्ये मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रसंग लिहिलेला होता. मुलगी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या रुमवर परतत होती. यावेळी दोन व्यक्तींनी तिचा पाठलाग केला. त्यांनी मुलीला धमकावून बडोद्यातील एका मैदानात नेलं. तिथं त्यांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर ते तिथून पळून गेले.

  बस चालकाची मदत

  संबंधित घटनेनंतर मुलीला आपल्या रुमवर जाण्यासाठी एका बस चालकाने मदत केली होती. पोलिसांनी संबंधित बस चालकाचा शोध घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने सांगितलेली माहिती खरी असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. "मी संध्याकाळी बस पार्क केल्यानंतर संबंधित परिसरात जात होतो त्यावेळी एका झाडाजवळ तरुणी अर्धनग्न अवस्थेत उभी होती. ती मदतीसाठी विनंती करत होती. आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती तिने दिली. दोन तरुणांनी माझे हात बांधून माझ्यासोबत गैरकृत्य केलं, असं ती रडत-रडत सांगत होती", अशी माहिती बस चालकाने दिली. हेही वाचा : रिक्षातून उतरताच तरुणाला घेरलं, छातीवर बंदूक रोखत लुटलं, आणि.... "मुलीने कपडे परिधान केल्यानंतर माझ्या मोबाईलने आपल्या मैत्रिणीला फोन केला. तिने आपल्या मैत्रिणीला चकली सर्कलला येण्यास सांगितलं. आम्ही तिला तिथे सुखरुप पोहोचवलं. त्यानंतर ती आपल्या मैत्रिणीसोबत निघून गेली", असंदेखील बसचालकाने सांगितलं.
  Published by:Chetan Patil
  First published:

  Tags: Crime, Gang Rape

  पुढील बातम्या