जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / रिक्षातून उतरताच तरुणाला घेरलं, छातीवर बंदूक रोखत लुटलं; देशाच्या राजधानीत गुन्हेगारांचा सुळसुळाट

रिक्षातून उतरताच तरुणाला घेरलं, छातीवर बंदूक रोखत लुटलं; देशाच्या राजधानीत गुन्हेगारांचा सुळसुळाट

रिक्षातून उतरताच तरुणाला घेरलं, छातीवर बंदूक रोखत लुटलं; देशाच्या राजधानीत गुन्हेगारांचा सुळसुळाट

पीडित युवकाचं इरफान असं नाव आहे. तो जाफराबाद येथील जीन्स फॅक्ट्रित काम करतो. तो मालकाकडून तीन हजार रुपये घेऊन आपल्या घरी रिक्षाने जात होता. त्यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी त्याला घेरलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (New Delhi) गुन्हेगारी (Crime) प्रचंड फोफावली आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा (Police) काहीच धाक राहिलेला दिसत नाहीय. कारण चोर (Thief) अगदी निडरपणे बंदुकीचा (Pistole) धाक दाखवत सर्वसामान्यांना लुटत (Robbery) आहेत. दिल्लीच्या गोकुलपुरी पोलीस ठाणे हद्दीत अशीच एक घटना समोर आली आहे. आरोपींनी एका तरुणाच्या छातीला पिस्तूल लावत त्याला जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली. त्यानंतर त्याच्याकडे असलेले सर्व पैसे लुटून आरोपी दुचाकीने फरार होऊ लागले.

नेमकं काय घडलं?

पीडित युवकाचं इरफान असं नाव आहे. तो जाफराबाद येथील जीन्स फॅक्ट्रित काम करतो. तो मालकाकडून तीन हजार रुपये घेऊन आपल्या घरी रिक्षाने जात होता. तो गोकुलपुरी ब्रिजजवळ रिक्षातून उतरुन आपल्या घराच्या दिशेला पायी चालत निघाला होता. त्यावेळी दोन बाईकवर आलेल्या चोघांनी त्याला घेरलं. त्यांनी इरफानच्या छातीवर बंदूक रोखली. त्यानंतर त्याच्या खिशातून तीन हजार रुपये काढले. त्यानंतर ते पळून जात होते. पण घटनास्थळी योग्यवेळी पोलीस दाखल झाल्याने दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आलं. हेही वाचा :  ‘काका मम्मी-पप्पांना मारु नका’, चिमुकल्यांची याचना; चुलत्याने गोळ्या झाडल्या

पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या?

आरोपी दुचाकीने फरार होण्याच्या प्रयत्नात असताना पीडित तरुणाने त्यांचा पाठलाग केला. यावेळी तो जोरजोरात ‘चोर-चोर, पकडा त्यांना’, असं ओरडत धावत सुटला. तरुणाचा ओरडण्याचा आवाज संबंधित परिसरात पेट्रोलिंगसाठी आलेल्या पोलिसांच्या कानावर पडला. पोलीस तातडीने मुलाच्या मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी पळून जाणाऱ्या दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या. पण त्यांचे दोन साथीदार हे बाईक रस्त्यावर सोडून पळून गेले. हेही वाचा :  डॉक्टरानं वृद्धेला दिलं दुसऱ्यांदा जीवदान; शस्त्रक्रियेविनाच बदलली हृदयाची झडप

आरोपींकडे सहा जिवंत काडतुसे

पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींचे अनिल आणि राहुल असे नावं आहेत. या आरोपींकडे तब्बल सहा जिवंत काडतुसे सापडले आहेत. पण लुटीचा माल आणि पिस्तूल घेऊन त्यांचे सहकारी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांकडून संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात