मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

लग्न अवघ्या पाच दिवसांवर असताना मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, पित्याचं टोकाचं पाऊल

लग्न अवघ्या पाच दिवसांवर असताना मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, पित्याचं टोकाचं पाऊल

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Aurangabad Suicide : आई-वडिलांनी ठरवलेलं लग्न अवघ्या पाच दिवसांवर असताना मुलीने धोका दिला. ती कुटुंबियांची नजर चुकवून घरातून निघून गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही. हा धक्का सहन न झाल्यानेे पित्याने टोकाचा निर्णय घेतला.

  औरंगाबाद, 15 नोव्हेंबर : प्रत्येक मुलगा किंवा मुलीने आयुष्यातील कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी आपल्या आई-वडिलांना (Mother-Father) त्याबाबत माहिती द्यायला हवी. किंवा त्या निर्णयाबाबत त्यांना विश्वासात नक्कीच घ्यायला हवं. काही निर्णय आई-वडिलांना आवडणार नाहीत. पण तुम्ही सजावून सांगितलं तर कदाचित त्यावर तोडगा निघू शकेल. याशिवाय आपले आई-वडील आपल्या मुलांच्या भल्यासाठीच योग्य निर्णय घेतात. त्यामुळे मुलांनी आई-वडिलांची जाणीव ठेवायला हवी. आई-वडिलांना तुमचा निर्णय आवडत नसेल तर त्यावर शांतपणे चर्चा करायला हवी. अन्यथा काहीतरी सुवर्णमध्य साधत त्यावर पर्याय शोधायला हवा. हे सगळं सांगण्या मागचं कारण म्हणजे औरंगाबादमध्ये (Aurangabad) घडलेली एक धक्कादायक घटना. औरंगाबादमध्ये एक तरुणी लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली (Girl ran away with Boyfriend). या घटनेचा धक्का सहन न झाल्याने पित्याने थेट आत्महत्या (Suicide) करुन आपलं आयुष्य संपवलं आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  आई-वडिलांनी ठरवलेलं लग्न अवघ्या पाच दिवसांवर असताना मुलीने धोका दिला. ती कुटुंबियांची नजर चुकवून घरातून निघून गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही. घरच्यांनी चौकशी केली असता ती एका मुलासोबत पळून गेल्याची चर्चा संबंधित पसरात रंगली. त्यामुळे मुलीचे वडील आतून खचले. आपली प्रचंड बदनामी होईल. समाजात तोंड कसं दाखवायचं? या विचाराने मुलीच्या वडिलांनी टोकाचा निर्णय घेतला. खरंतर आत्महत्या हा त्यावरचा उपाय निश्चितच नव्हता. पण मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं. या घटनेवर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा : रिक्षातून उतरताच तरुणाला घेरलं, छातीवर बंदूक रोखत लुटलं, आणि....

  धक्का सहन न झाल्याने पित्याची आत्महत्या

  मृतकाच्या मुलीचे 19 नोव्हेंबरला लग्न ठरलं होतं. मुलीचे वडील तिचं मोठ्या जल्लोषात आणि धामधुमीत लग्न लावण्याच्या तयारीत होते. लग्नाचं सर्व पाहुणे, नातेवाईकांना निमंत्रण देण्यात आलं होतं. घरात लग्नाची लगबग सुरु झाली होती. लग्नाचा हॉल बुक झाला होता. जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. लग्नाची सर्व तयारी झाली होती. पण लग्नाच्या पाच दिवसांआधीच मुलगी दुसऱ्याच मुलासोबत पळून गेली. मुलीच्या वडिलांनी प्रचंड शोधाशोध केली. तरीही मुलीचा शोध न लागल्याने त्यांनी साताऱ्यातील एका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण हा धक्का सहन न झाल्याने मुलीच्या वडिलांनी शनिवारी (13 नोव्हेंबर) संग्रामनगर येथील उड्डाणपुलावरुन रेल्वे रुळावर झोकून देत आत्महत्या केली. हेही वाचा : 'काका मम्मी-पप्पांना मारु नका', चिमुकल्यांची याचना; चुलत्याने गोळ्या झाडल्या

  पित्याकडून सुलाईड नोटमधून आक्रोश व्यक्त

  मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी आपल्या पत्नीला उद्देशून मुलीला घरात पुन्हा कधीच न घेण्याचं आवाहन केलंय. "मी जग सोडून जातोय. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीही आपल्या घरात प्रवेश देऊ नको. माझ्या मुलाचे लग्न चांगले लाव. तू कायम आठवणीत राहशील. मात्र आता त्या मुलीला माझ्या घरात स्थान नाही", अशा शब्दात पित्याने सुसाईड नोटमध्ये आक्रोश व्यक्त केला आहे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या