मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

व्याजासह पैसे परत करूनही सावकाराचं तरुणासोबत क्रूर कृत्य, पुण्यातील विचित्र घटना

व्याजासह पैसे परत करूनही सावकाराचं तरुणासोबत क्रूर कृत्य, पुण्यातील विचित्र घटना

फाईल फोटो

फाईल फोटो

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून मारहाणीची एक घटना समोर आली आहे. यात सावकाराने तरुणाचं अपहरण करुन त्याला जबर मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे 25 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हत्या, मारहाण, चोरीसह इतरही अनेक घटना दररोज समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून मारहाणीची एक घटना समोर आली आहे. यात सावकाराने तरुणाचं अपहरण करुन त्याला जबर मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गर्ल्स हॉस्टेलमध्ये छुपा कॅमेरा लावून मुलींचे 1200 अर्धनग्न व्हिडीओ; प्रेयसीसोबतही धक्कादायक कृत्य

शिरुर तालुक्यातील एका महिलेनं आपल्या जावयाच्या आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आणि त्याला मदत करण्यासाठी शिक्रापूर हद्दीतील सावकाराकडून पैसे घेतले होते. सागर सासवडे असं या सावकाराचं नाव असून महिलेनं त्यांच्याकडून 10 लाख रुपये व्याजाने घेतले होते. यासाठी महिलेनं जमिनही गहाण ठेवली होती.सावकाराकडून घेतलेल्या पैशांच्या बदल्यात महिलेनं मुद्दलीसह 12 लाखांची परतफेडही केली. मात्र आपले पैसे व्याजासह परत मिळूनही सावकाराने क्रूरतेचा कळस गाठला.

या सावकाराने गहाण ठेवलेली जमिन परत दिलीच नाही. इतकंच नाही तर त्याने पुन्हा पैशाची मागणी केली. मात्र, महिलेनं आधीच व्याजासह पैशांची परतफेड केली असल्याने तिने पैसे दिले नाहीत. पैसे न दिल्याने सावकारकी करणा-या सागरने महिलेच्या जावयाचं अपहरण केलं. यानंतर त्याला शेतात नेत जबर मारहाण केली.

Shraddha Walkar Murder Case : आफताबने श्रद्धाचा मोबाईल कुठे फेकला? दिल्ली पोलिसांच्या हाती महत्वाची धागेदोरे

या घटनेनंतर महिलेनं सावकाराच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन सागर सासवडे याच्यावर शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावकारी आणि फसवणूक प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune news