मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आधी पूर्ण गावातील लाईट बंद केल्या; मग चौकातच कोयत्याने हल्ला, भावाकडूनच 15 वर्षीय मुलाची हत्या

आधी पूर्ण गावातील लाईट बंद केल्या; मग चौकातच कोयत्याने हल्ला, भावाकडूनच 15 वर्षीय मुलाची हत्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

गावातील लाईट बंद करून भर चौकात अज्ञात आरोपीने कोयत्याने या 15 वर्षीय मुलावर सपासप वार केले. यात हा मुलगा गंभीर जखमी झाला अन्..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड 24 नोव्हेंबर : गुन्हेगारीची आणखी एक घटना बीडमधून समोर आली आहे. या घटनेत 15 वर्षीय शाळकरी मुलाचा निर्दयी खून करण्यात आला आहे. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. या घटनेनंतर मुलाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

धक्कादायक! मनमाडमध्ये रेल्वेत प्रवाशांवर माथेफीरूचा अ‍ॅसिड हल्ला; चार जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील लाईट बंद करून भर चौकात अज्ञात आरोपीने कोयत्याने या 15 वर्षीय मुलावर सपासप वार केले. यात हा मुलगा गंभीर जखमी झाला. सुरज श्रीकृष्ण शिंदे वय 15 वर्षे असं या शाळकरी मुलाचं नावं आहे.. हा हल्ला इतका भयानक होता की घटनेनंतर उपचारासाठी नेत असतानाच मुलाचा मृत्यू झाला.

घरगुती वादातून चुलत भावानेच ही हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने रात्री आठच्या सुमारास गावातील लाईट बंद करून भर चौकात सुरज शिंदे याच्यावर धारधार कोयत्याने सपासप वार केले. गावातील लोकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडोओरड करायला सुरुवात केली. यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. याप्रकरणी वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला पण निर्णय चुकला; प्रेमानेच घेतला 19 वर्षीय तरुणीचा जीव

पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीची हत्या -

दरम्यान नुकतंच पुण्यातूनही हत्येची एक हादरवून टाकणारी घटना समोर आली होती. यात प्रियकराने एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या केली. ही घटना चाकणधून उघडकीस आली. प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीची केवळ यासाठी हत्या केली, कारण ती जुन्या प्रेमसंबंधाकडे दुर्लक्ष करत आहे, असं त्याला वाटलं. प्रेयसी आपल्याकडे दुर्लक्ष करत असून आपल्यासोबत बोलत नसल्याच्या रागातून प्रियकराने 28 वर्षीय विवाहित महिलेचा खून केल्याचा प्रकार चाकणमध्ये उघडकीस आला.

First published:

Tags: Crime news, Murder news