Home /News /crime /

उदयपूर हत्या प्रकरण : हिंदू टेलरच्या निर्दयी हत्येनंतर गेहलोत सरकारने उचललं मोठं पाऊल

उदयपूर हत्या प्रकरण : हिंदू टेलरच्या निर्दयी हत्येनंतर गेहलोत सरकारने उचललं मोठं पाऊल

प्रेषित पैगंबरांच्या कथित अपमानाच्या निषेधार्थ उदयपूरमधील एका हिंदू टेलरची गळा कापून हत्या करण्यात आली (Udaipur Tailor Murder Case). याप्रकरणी राजस्थान सरकार आता डॅमेज कंट्रोलच्या स्थितीत आहे

    जयपूर 02 जुलै : प्रेषित पैगंबरांच्या कथित अपमानाच्या निषेधार्थ उदयपूरमधील एका हिंदू टेलरची गळा कापून हत्या करण्यात आली (Udaipur Tailor Murder Case). याप्रकरणी राजस्थान सरकार आता डॅमेज कंट्रोलच्या स्थितीत आहे. कारवाई करत सरकारने शुक्रवारी उदयपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीना यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केलं. याआधी गुरुवारी रात्री उशिरा उदयपूर रेंजचे आयजी आणि एसएसपी यांची बदली करण्यात आली. राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव (पोलीस) जगवीर सिंग यांनी उदयपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीणा यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. मात्र, निलंबनाचं कारण आदेशात नमूद केलेलं नाही. टेलर कन्हैयालाल साहू यांच्या हत्येप्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं. या प्रकरणी पोलीस ठाण्याचे एसएचओ आणि एएसआय यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलं आहे. कन्हैया लाल साहू यांची मंगळवारी रात्री त्यांच्या दुकानात घुसलेल्या दोन जिहादींनी चाकूने गळा चिरून हत्या केली. पुराव्यासाठी कोर्टात आणलेल्या बॉम्बचा ब्लास्ट, परिसर हादरलं; अनेक पोलीस गंभीर जखमी राजस्थान सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या तपासात मृत कन्हैया लाल साहूच्या दुकानापासून सुमारे 500 मीटर अंतरावर एक पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा सापडली. या अ‍ॅक्टिव्हा गाडीचा क्रमांक RJ-27-BS-1226 असल्याचं सांगण्यात येत आहे. ही अॅक्टिव्हा गौस मोहम्मदच्या नावाने नोंदणीकृत आहे. या अ‍ॅक्टिव्हावर बसून या गौस मोहम्मद रियाज अत्तारी हा हत्या करण्यासाठी आला असल्याचं समजतं. दुसरीकडे, हिंदू टेलरचा गळा कापल्याच्या विरोधात देशभरात संताप आणि या प्रकरणाचा निषेध सुरू आहे. या हत्याकांडाच्या विरोधात आज राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. आज किशनगड, अलवर, करौली, अजमेर आणि हिंडन शहरातील बाजारपेठा बंद राहतील. भाजपच्या आवाहनावरून या शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. महिलेने 3 निष्पाप मुलींसह उचलले भयानक पाऊल, कुटुंबीयांना माहिती मिळताच बसला धक्का एनआयएने तपासादरम्यान मोहसीन आणि आसिफ नावाच्या आणखी दोन आरोपींना कन्हैया लाल साहू हत्येप्रकरणी अटक केली आहे. त्यांना आज जयपूर येथील एनआयए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एनआयएच्या आवाहानानंतर आता उदयपूरच्या कोर्टाने सर्व पत्रं जयपूरच्या एनआयए कोर्टात हस्तांतरित केली आहेत. आता या हत्या प्रकरणातील सर्व सुनावणी जयपूरच्या कोर्टातच होणार आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या