मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /इंजीनिअर झाली, नोकरी मिळाल्यावर टाळायला लागली गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडने घेतली मौलानाची मदत, घडलं भयानक

इंजीनिअर झाली, नोकरी मिळाल्यावर टाळायला लागली गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडने घेतली मौलानाची मदत, घडलं भयानक

मृत प्रियकर दीपक

मृत प्रियकर दीपक

दीपकचे तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. रांचीमध्ये शिकत असताना त्याची प्रेयसी अनेकदा त्याच्या खोलीतही यायची.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jharkhand, India

रांची, 19 जानेवारी : झारखंडची राजधानी रांचीच्या सुखदेवनगरमध्ये राहणारा एमबीएचा विद्यार्थी दीपक कुमारच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. बालपणीच्या प्रेयसीने फसवणूक केल्याने तो नैराश्यात आल्याचे मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. दीपक आपली प्रेयसीला परत मिळविण्यासाठी मौलानाच्या  चक्करमध्ये अडकला होता. यादरम्यान तांत्रिक आणि त्याच्या एका मित्राने त्याच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला होता. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

एमबीएच्या विद्यार्थ्याला तांत्रिक आणि त्याच्या मित्राकडून ब्लॅकमेलही केले जात होते. त्यामुळेच आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. दीपकचे वडील निवृत्त आर्मी मॅन आहेत. याप्रकरणी मृत विद्यार्थ्याच्या वडिलांच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, दीपक रांचीमधील एका खासगी संस्थेत एमबीए करत होता. तसेच दीपकचे खलारी येथील एका मुलीशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. शाळेच्या काळापासून दोघेही एकमेकांना पसंत करत होते, पण मैत्रिणीची बंगळुरूमध्ये एंगेजमेंट झाली, त्यानंतर दोघे वेगळे झाले.

नोकरी मिळाल्यानंतर प्रेयसीने दुरावा निर्माण केला -

मृत विद्यार्थ्याच्या आईचे म्हणणे आहे की, दीपकचे गेल्या 6 वर्षांपासून एका मुलीवर प्रेम होते, ती मुलगी त्यांच्याच जातीची होती. आईनेही दीपकचे तिच्याशी लग्न करण्यास होकार दिला होता, पण आधी स्वत:च्या पायावर उभा राहीन, त्यानंतर तिच्या घरी जाऊन मुलीचा हात मागणार असल्याचे दीपकने सांगितले होते. दरम्यान, मुलगी इंजिनिअर झाली आणि तिला बंगळुरूमध्ये नोकरी लागली. पण यानंतर तरुणीने नोकरी मिळताच दीपकपासून स्वत:ला दूर केले. त्याच्याशी बोलणंही बंद केलं. त्यामुळे दीपक खूप तणावात असायचा. दरम्यान, दीपक त्याच्या एका मित्राच्या प्रभावाखाली आला. यासोबतच तो एका मौलवीच्या चक्करमध्ये पडला. हा प्रकार दीपकच्या घरच्यांना नंतर माहिती झाला.

प्रेयसी अनेकदा दीपकच्या खोलीत यायची -

मृताच्या बहिणीने सांगितले की, दीपकचे तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. रांचीमध्ये शिकत असताना त्याची प्रेयसी अनेकदा त्याच्या खोलीतही यायची. यापूर्वी दोघांमध्ये चांगले संबंध होते. एकदा मुलीला स्टेशनवर सोडायला जायचे, त्या दिवशी पाऊस पडत होता. त्या वादळी पावसात दीपकने आपला रेनकोट त्या मुलीला दिला आणि स्वतः ओला होऊन तिला स्टेशनवर सोडायला गेला. पण अचानक असे काय घडले माहिती नाही, की ज्यामुळे तरुणीने प्रियकर दिपकपासून दूर केले. त्यानंतर दीपक गप्प बसू लागला. तो नीट जेवणही करत नसे.

हेही वाचा - बराच वेळ मित्रासोबत फोनवर बोलली, मग ओरडण्याचा आवाज आला अन् कायद्याच्या विद्यार्थिनीचा भयानक शेवट

तंत्र-मंत्राद्वारे प्रेयसी परत येईल, मौलानाने केला होता दावा -

नातेवाइकांचे म्हणणे आहे की, दीपकने हा सगळा प्रकार त्याचा मित्र नसीमला सांगितल्यावर त्याने त्याची ओळख एका मौलानाशी करून दिली. तंत्र-मंत्राद्वारे प्रेयसीला परत मिळवून देणार असल्याचा दावा मौलानाच्या वतीने करण्यात आला होता. यादरम्यान त्याच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्याचवेळी दीपकला नसीम आणि मौलानाकडून ब्लॅकमेलही केले जात होते. या सर्व परिस्थितीला कंटाळून दीपकने मंगळवारी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Jharkhand, Love story