जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नव्या नवरीने दिली Good News; नवरदेवाला बसला धक्का, थेट पोलिसात धाव!

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नव्या नवरीने दिली Good News; नवरदेवाला बसला धक्का, थेट पोलिसात धाव!

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नव्या नवरीने दिली Good News; नवरदेवाला बसला धक्का, थेट पोलिसात धाव!

या सर्व प्रकारानंतर नवरदेवाला जबर धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 18 जून : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) महराजगंज जिल्ह्यातील एका नवविवाहिता लग्नाच्या दीड महिन्यांनंतर 4 महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवविवाहितेला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेलं. येथे अल्ट्रासाऊंड केल्यानंतर धक्कादायक रिपोर्ट समोर आला. या रिपोर्टनुसार, नवविवाहिता 4 महिन्यांची गर्भवती असल्याचं कळालं. यानंतर सासरच्या मंडळींनी मुलीच्या कुटुंबीयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कोल्हुई पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथे पीडित पतीने सांगितलं की, गावात राहणाऱ्या एका नातेवाईकांच्या माध्यमातून दीड महिन्यांपूर्वी लग्न करवून देण्यात आलं होतं. तरुणी शेजारच्या जिल्ह्यातच राहते. पत्नीला लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून त्रास होत होता. तिला पोटदुखीचा त्रास होत होता. एकेदिवशी अचानक तिला उटल्या होऊ लागल्या. ज्यानंतर गुरुवारी प्रकृती अधिक ढासळल्याने तिला जिल्ह्या रुग्णालयात नेण्यात आलं. येथे डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीच्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर दोन्ही पक्षात भांडण अल्ट्रासाउंड रिपोर्ट समोर आल्यानंतर नवविवाहिता गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर सासरच्या मंडळींनी मुलीच्या नातेवाईकांकडे याबाबत जाब विचारला. मुलीच्या नातेवाईकांनी हा रिपोर्ट चुकीचा असल्याचं सांगितलं. त्यांनी पुन्हा अल्ट्रासाऊंड केलं, यात तरुणी गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात