भोपाळ, 17 जून : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) शिवपुरीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त असं गिफ्ट दिलं, की ज्याबाबत तुम्ही वाचलं तर हैराण व्हाल. पत्नीला जेव्हा पतीच्या कृत्याबद्दल कळालं तिच्या पायाखालची जमीन सरकली. या पठ्ठ्याने पत्नीला एखादी गाडी वा दागिना नाही तर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त (First Marriage Anniversary) दुसरी पत्नी गिफ्ट केली. यानंतर महिलेने तातडीने पोलीस ठाणे गाठलं. तिने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. विवाहितेचं म्हणणं आहे की, 10 जून 2021 रोजी तिचं लग्न झालं होतं. यानंतर पतीने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दुसरं लग्न केलं. महिलेने सांगितलं की, 2018 मध्ये वीपी नावाच्या तरुणासोबत तिच्या लग्नाची बोलणी सुरू होती. वीपीचे कुटुंबीय तिला पाहण्यासाठी घरीदेखील आले होते. यानंतर कुटुंबीयांनी लग्नास परवानगी दिली. महिलेने दावा केला आहे की, वीपीच्या कुटुंबीयांनी यानंतर हुंड्याची मागणी केली होती. महिलेने दावा केला आहे की, तिच्या वडिलांनी जास्त हुंडा देण्यास नकार दिला होता. यानंतर त्याचं नातं पुढे जाऊ शकलं नव्हतं. एकेदिवशी तिला वीपीचा फोन आला. त्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर ते दोघं एकमेकांशी बोलू लागले. महिलेचा आरोपी आहे की, वीपी वारंवार त्याला लग्नाचं आमिष दाखवित होता. यादरम्यान वीपीने तिला अभ्यासाचं कारण सांगून शिवपुरीमध्ये खोली घेऊन एकत्र राहू असंही सांगितलं. पीडितेचं म्हणणं आहे की, वीपीच्या बोलण्यात अडकून तिने शिवपुरी कस्टम गेटवर भाड्याने घर घेऊन राहू लागली होती. येथे वीपीचं येण-जाणं होतं. यादरम्यान वीपीने लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केला. ज्याबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.