नवी दिल्ली, 15 मार्च : गोव्यातील प्रसिद्ध अंजुना बीच परिसरात दिल्लीतून आलेल्या पर्यटकांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. ज्याची संपूर्ण माहिती जतिन शर्मा नावाच्या तरुणाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. पीडित पर्यटकांशी झालेल्या चर्चेच्या आधारे इंडियन एक्सप्रेसने या घटनेबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जतिन शर्मा म्हणाले, आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून या ट्रिपचे नियोजन करत होतो. गोव्यात माझी ही पहिलीच वेळ होती आणि ज्या प्रकारे माझ्यावर चाकू आणि बेल्टने हल्ला झाला त्या ठिकाणी मी पुन्हा कधीही जाऊ शकणार नाही. अशी पोस्ट लिहत गोव्यातील वागणुकीची माहिती दिली आहे.
मुंबई हादरली, लालबागमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत आढळला महिलेचा मृतदेह
तो पुढे म्हणाला की, मी, आई आणि बहिणीसह सात जणांचे कुटुंब गोव्यात गेलो होतो. 5मार्च रोजी एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथे आम्ही स्विमींगपूलमध्ये पोहत असताना एकाने अश्लील टिप्पणी केली. आम्ही हॉटेलच्या कर्मचार्यांकडे हा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा कर्मचाऱ्यांनी आम्हाला तशीच वागणूक दिली. यामुळे आम्ही आमचे बुकींग थांबवले. याचबरोबर आम्ही याप्रकरणी तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याने आम्हाला द्यायला सुरुवात केली. जतीन आणि त्याचे कुटुंब ग्रेटर नोएडा येथे राहतात आणि सलून चालवतात.
काही तासांनंतर, संध्याकाळी 6 च्या सुमारास, जतीन शर्मा आणि त्यांचे कुटुंब रिसॉर्टच्या बाहेर असताना, निलंबित कर्मचारी रॉयस्टन डायस उर्फ रोशनसह इतर किमान 3 जणांनी त्यांच्याशी वाद घातला. यामध्ये त्यांच्यात वाद झाला यातून तिघांनी मिळून जतीन याला मारहाण केली. जतीन म्हणाला, त्यांच्याकडे चाकू, बेसबॉल बॅट आणि बेल्ट होते त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे माझ्या छातीच्या डाव्या बाजूला दुखापत झाली. माझे काका आणि 59 वर्षीय वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. माझ्या काकांच्या उजव्या हाताच्या तळव्यावर जोरदार वार केल्याने मोठा घाव बसला आहे. माझ्या वडिलांच्या उजव्या हाताला अनेक जखमा झाल्या आहेत. अशीही तक्रार त्यांनी दिली आहे.
क्रुरतेचा कळस! डॉक्टरने थेट ड्रायव्हरचे करवतीने 70 तुकडे केले, कारणही भयानक
जतिन शर्मा यांचे काका आणि तक्रारदार अश्वनी कुमार (47) यांनी सांगितले की, आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे हा हल्ला झाला. दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील कुमार म्हणाले, माझी पत्नी आणि भाची मदतीसाठी ओरडत राहिले, पण ते थांबले नाहीत. तिघांनाही स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले, तेथून अश्विनी कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला.
तर जतिन शर्मा आणि त्यांचे वडील अनिल यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. बांबोलीम येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 6 मार्च रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, कुटुंब दुसर्या रिसॉर्टमध्ये थांबले आणि 9 मार्च रोजी दिल्लीला परतले. परंतु त्यांच्यावर गोव्यात असा भयानक प्रकार घडल्याने त्यांनी गोव्यातील पर्यटनाविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Goa