मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Doctor Murder Driver : क्रुरतेचा कळस! डॉक्टरने थेट ड्रायव्हरचे करवतीने 70 तुकडे केले, कारणही भयानक

Doctor Murder Driver : क्रुरतेचा कळस! डॉक्टरने थेट ड्रायव्हरचे करवतीने 70 तुकडे केले, कारणही भयानक

लोक डॉक्टरांकडे आदराने पाहतात यामुळे त्यांना समाजात मोठं स्थान आहे. पण जेव्हा हेच डॉक्टर खुनी होतात तेव्हा तुम्ही काय म्हणाल?

लोक डॉक्टरांकडे आदराने पाहतात यामुळे त्यांना समाजात मोठं स्थान आहे. पण जेव्हा हेच डॉक्टर खुनी होतात तेव्हा तुम्ही काय म्हणाल?

लोक डॉक्टरांकडे आदराने पाहतात यामुळे त्यांना समाजात मोठं स्थान आहे. पण जेव्हा हेच डॉक्टर खुनी होतात तेव्हा तुम्ही काय म्हणाल?

  • Local18
  • Last Updated :
  • Madhya Pradesh, India

शैलेंद्र कौरव (नर्मदापुरम) : आपला मौल्यवान जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांना पृथ्वीवर देव मानलं जातं. अत्यंत वाईट स्थितीत असणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर आपले सर्वस्व देतात. यामुळे त्यांना समाजात वेगळे स्थान आहे. लोक डॉक्टरांकडे आदराने पाहतात यामुळे त्यांना समाजात मोठं स्थान आहे. पण जेव्हा हेच डॉक्टर खुनी होतात तेव्हा तुम्ही काय म्हणाल?

मध्य प्रदेशातील नर्मदापुरममध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका डॉक्टरने ड्रायव्हरची हत्या करून त्याच्या शरीराचे 70 पेक्षा जास्त तुकडे केले होते. क्रूर डॉक्टर एवढं करूनही थांबला मृतदेहाचे छिन्नविछिन्न तुकडे केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने अॅसिड भरलेल्या ड्रममध्ये तुकडे टाकले. आता या मारेकरी डॉक्टरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

शौचालयाला गेली महिला, नराधमाने साधला डाव अन् केलं भयानक कृत्य

नर्मदापुरममध्ये चालकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी डॉ. सुनील मंत्री याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात द्वितीय एडीजे हिमांशू कौशल यांनी निकाल देताना आरोपी डॉ. सुनील मंत्री यांना भादंवि कलम 302 अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

4 फेब्रुवारी 2019 रोजी इटारसी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुनील मंत्री यांनी पैशाच्या व्यवहारातून स्वत:च्या ड्रायव्हरची निर्घृण हत्या केली. ड्रायव्हरला मारण्यासाठी डॉक्टरांनी आधी ड्रायव्हर वीरूला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर डॉक्टरने चालकाचा गळा चिरून खून केला होता.

ड्रायव्हरची हत्या केल्यानंतर डॉक्टर सुनील मंत्रीने लाकूड कापण्याच्या करवतीने त्याच्या मृतदेहाचे 70 हून अधिक तुकडे केले होते. पुरावे खोडून खून लपवण्याच्या उद्देशाने डॉक्टरने ड्रायव्हरच्या मृतदेहाचे तुकडे अॅसिडने वितळण्यासाठी ड्रममध्ये ठेवले होते. डॉक्टरांच्या काही शेजाऱ्यांनी अ‍ॅसिडच्या दुर्गंधीबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती.

धक्कादायक! जेवण मिळावं म्हणून तरुणाचं भयानक कृत्य, वाचा सविस्तर...

यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून हत्येचा खुलासा केला. चार वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आता कोर्टाने डॉ.सुनील मंत्री खून प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Madhya pradesh, Murder news