मुंबई, 15 मार्च : मुंबईमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. लालबागमधील पेरू कम्पाऊंड परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचा मृतदेह प्रथम प्लास्टिकच्या पिशवीत भरून नंतर कपाटात बंद करून ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाचौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृताचे वय 50 ते 55 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई के लालबाग इलाके में एक वादी ने अपनी बहन के गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज़ कराई थी। महिला के घर में तलाशी के दौरान एक प्लास्टिक बैग में विघटित अवस्था में महिला का शव मिला। शव को पोस्टमार्टम के लिए भेजा गया है। जांच जारी है: DCP प्रवीण मुंडे, मुंबई pic.twitter.com/fzdm92Vz4N
— ANI_HindiNews (@AHindinews) March 15, 2023
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस मृत महिलेच्या मुलीची चौकशी करत आहेत. मुलीनेच खून करून मृतदेह पॅक करून कपाटात लपवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, पोलिसांनी हत्येचं कारण नेमकं काय आहे, याचा तपास करत आहे. या प्रकरणी २२ वर्षीय मुलीला ताब्यात घेण्यात आले असून तिची चौकशी सुरू असल्याचे डीसीपी प्रवीण मुंडे यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. इमारतीत आढळला तरुणाचा मृतदेह दरम्यान, लालबाग परिसरातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निर्माणाधीन इमारतीतून 19 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. बाराव्या मजल्यावर हा मृतदेह सापडला आहे. मसूदमिया रमझान असं मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या हत्येपूर्वी तिच्या हातपाय बांधले होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही इमारत 45 मजल्यांची आहे. याच इमारतीत मृत तरुण काम करत होता. तो मुळचा पश्चिम बंगालचा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.