मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'आई-बाबा घरी नाहीत, तू ये..'; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् तरुणासोबत भयानक घडलं

'आई-बाबा घरी नाहीत, तू ये..'; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् तरुणासोबत भयानक घडलं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथून त्याला चांगल्या उपचारासाठी हायर सेंटरला रेफर करण्यात आलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 09 डिसेंबर : कोणी घरी नसताना आपल्या प्रेयसीला भेटायला जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. यात तरुणीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला चोर समजून चांगलाच चोप दिला. ही घटना उत्तर प्रदेशातील बांदा येथून समोर आली आहे. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथून त्याला चांगल्या उपचारासाठी हायर सेंटरला रेफर करण्यात आलं. हे प्रकरण बिसंडा ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावातील आहे.

तरुणाकडून छेडछाडीचा जाच, कंटाळून बीडमध्ये 23 वर्षीय तरुणीचं भयानक पाऊल

जखमी प्रियकराने सांगितलं की, तो डीजे वाजवण्याचं काम करतो. रात्री डीजे वाजवून तो घरी परतत होता. यादरम्यान प्रेयसीने घड्याळ देण्यासाठी फोन करून बोलावलं. ती म्हणाली की, आई-वडील घरी नाहीत. तू ये आणि गिफ्ट दिलेलं घड्याळ घेऊन जा. तो प्रेयसीच्या दारात पोहोचला. त्यानंतर तो दरवाजा उघडून आत जाऊ लागला.

यादरम्यान मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी त्याला पाहिलं आणि तिला चोर समजून बेदम मारहाण केली. गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोकही जमा झाले. अखेर लोकांना समजावून प्रकरण शांत करण्यात आलं. मग या तरुणाने सगळं सत्य सांगितलं. यानंतर लोकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, की आता या युवकाची प्रकृती स्थिर आहे. उपचार सुरू आहेत आणि लवकरच तो बरा होईल.

ब्रेकअप झालं म्हणून व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला गर्लफ्रेंडचा नग्न फोटो; पुण्यातील प्रकाराने खळबळ

या प्रकरणी बिसंडा पोलीस स्टेशनचे स्टेशन प्रभारी आनंद कुमार यांनी सांगितलं की, "एक तरुण डीजे वाजवायला गेला होता. घरी जात असताना तो एका मुलीच्या घरी गेला होता. त्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल."

First published:

Tags: Crime news, Shocking news