पुणे, 8 डिसेंबर : अलीकडील दिवसांमध्ये नातेसंबंधातून गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर सर्वाधिक होत आहे. पुण्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने खळबळ उडाली. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिरूरमधील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र धरमचंद फुलपगार असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.
वाचा - Instagram वरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, लग्नाचे आमिष देत शारिरीक संबंध, नकार...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही प्रेमसंबंधात होते. काही दिवसांपूर्वी दोघाचं ब्रेकअप झालं. त्यानंतर प्रियकर देवेंद्र याने पीडितेला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रियकर तिचा मानसिक छळ करत होता. या सर्व छळाला कंटाळून शेवटी तिने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे आरोपीने प्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
'गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकला'
फोटो व्हायरल झाल्यानंतर पीडितेला मोठा धक्का बसला. या सगळ्या प्रकरणाची तक्रार तरुणीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी आरोपी असलेल्या देवेंद्रवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तिच्यावर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्याने तगादा लावला होता. गुन्हा मागे न घेतल्याने आरोपीने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तरुणीचा विवस्त्रावस्थेतील फोटो ठेवून ‘ये तो शुरुआत है’ असे स्टेटस ठेवले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.