जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / भंडाऱ्यात दृश्यमसारखी घटना, 4 वर्षांनंतर मारेकरी सापडले; पण तरुणीचा मृतदेह अजूनही गायब

भंडाऱ्यात दृश्यमसारखी घटना, 4 वर्षांनंतर मारेकरी सापडले; पण तरुणीचा मृतदेह अजूनही गायब

(भंडाऱ्यात दृश्यम चित्रपटासारखी घटना)

(भंडाऱ्यात दृश्यम चित्रपटासारखी घटना)

2019 मध्ये कामाच्या ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या कवलेवाडा येथील अर्चना राऊत नामक युवतीचा खून झाल्याचं उघड झालं आहे.

  • -MIN READ Bhandara,Maharashtra
  • Last Updated :

नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 26 मे : भंडारा जिल्ह्यात दृश्यम चित्रपटाला शोभेल असा खुनाच्या प्रकार घडला आहे. एका 23 वर्षीय तरुणीच्या हत्येचा गुन्हा सिद्ध झाला आहे. आरोपी ही अटक झाले आहे. मात्र 4 दिवस शोध घेऊनही अद्याप पोलिसांना तरुणीचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे या तरुणीचा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,bhaमृतदेह सापडला नसला तरी साक्षीदाराच्या माहितीवरून तब्बल 4 वर्षांनंतर गोबरवाही पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत तिघांना गजाआड केलं आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या सदर घटनेत पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या आदेशावरून गोबरवाही पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (बादलीत लघवी करून मोलकरणीचं धक्कादायक कृत्य, CCTV फुटेज पाहून सगळे हादरले, कोर्टाने सुनावली शिक्षा) आरोपींमध्ये संजय चित्तरंजन बोरकर (47), राजकुमार उर्फ राजु चितरंजन बोरकर ( 50 ) आणि धरम फागु सयाम (42) रा. मोहगाव टोला यांचा समावेश आहे. तुमसर न्यायालयाने 31 मे पर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (‘तिचं शरीर ओरबडायचा, जखमा करायचा अन्…’; अल्पवयीन पीडितेच्या आईनं उघड केली धक्कादायक घटना) घटनेच्या दिवसापासून अद्याप बेपत्ता असलेली अर्चना माणिक राऊत ( 23 ) ही युवती संशयित आरोपी संजय बोरकर याच्या घरी कामाला गेली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबीयांनी गोबरवाही पोलिसांत तक्रार नोंदविली होती. घटनेच्या दिवशी आरोपींच्या घरी अर्चनाची आई गेली असता तिने आपल्या मुलीचा पिवळा दुप्पटा आणि चप्पल पाहिला होता. मात्र आरोपींनी तिला हाकलून लावले. गोंबरवाही पोलिसांवर वाढता दबाब लक्षात घेता. या घटनेतील एकमेव साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या गुप्त माहितीतून अर्चानाच्या क्रूर हत्येची माहिती समोर आली. पोलिसांनी घटनेत तिघांविरुद्ध कलम 302, 201, 34 अन्वये गुन्हा दाखल केला खरा अद्यापही पोलिसांना अर्चनाचा मृतदेह गवसलेला नाही. पोलिसांचा शोध अद्याप सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात