पाटणा 26 मे : दानापूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी पीडितेला दानापूर उपविभागीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला गेला असून पुढील कारवाईही सुरू आहे.
भूषण नावाचा आरोपी अनेक दिवसांपासून अल्पवयीन पीडितेला, तिचे वडील आणि कुटुंबीयांना सतत त्रास देत होता. या प्रकाराला कंटाळून पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देणं योग्य मानलं. याप्रकरणी पोलिसात जाऊन तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.
घटनेची माहिती देताना पीडितेच्या आईने सांगितलं की, भूषण नावाच्या आरोपीने तिच्या मुलीला जबरदस्तीने घरातून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना निर्दयीपणा दाखवत त्याने शरीराच्या अनेक भागांवर ओरखडलं आणि जखमाही केल्या.
पीडितेच्या आईने सांगितलं की, आरोपी तिच्या मुलीला अंग दाबायला सांगतो आणि दादागिरी दाखवत घरच्यांना धमकी देतो की, मी बोलवेल तेव्हा मुलीला माझ्याकडे पाठवायचं. आरोपीला कंटाळून मुलीच्या आईने दानापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18