नोएडा 26 मे : नोएडाचा एक लाजिरवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मोलकरीण (मेड) फ्लॅटची फरशी पुसत असल्याचं दिसून येतं. मात्र, मॉपिंग करणारी मोलकरीण अचानक बादलीत लघवी करू लागते. यानंतर ती बादली घेते आणि फरशी पुसण्यासाठी दुसऱ्या खोलीत जाते. सबिना खातून असं या मोलकरणीचं नाव आहे. सबिनाला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आलं 25 सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये ही 24 मेची घटना असल्याचं दिसून येतं. हा व्हिडिओ दुपारी साडेबारा वाजताचा आहे. साडी नेसलेली एक महिला खोली पुसत आहे. मग अचानक मोलकरीण खुर्चीच्या बाजूला बादलीवर बसून लघवी करू लागते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यानंतर ती महिला बादली उचलते आणि फ्लॅटमधील दुसऱ्या खोलीत जाते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. VIDEO - ऊन लागतं म्हणून आईने सावलीत ठेवताच लेकीचा मृत्यू; CCTV कॅमेऱ्यात कैद झालं धक्कादायक कारण ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 25 सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण ग्रेटर नोएडाच्या अजनारा होम सोसायटीचं आहे. फ्लॅटच्या मालकाने मोलकरणीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या मेडला अटक केली आहे. बादलीत लघवी करून त्यानेच खोली पुसल्याचं मेडने मान्य केलं आहे. सबिना खातून असं या मोलकरणीचं नाव आहे. सबीनाचं हे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या सोसायटीतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. बिसरख पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, महिलेला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर महिलेला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने महिलेची तुरुंगात रवानगी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.